शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
3
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
4
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
5
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
8
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
9
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
10
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
11
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
12
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
13
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
14
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
15
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
16
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
17
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
18
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
19
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
20
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय

‘आधार’ नसल्यास शिधापत्रिका होणार रद्द

By admin | Updated: August 11, 2016 00:02 IST

बोगस शिधापत्रिका धारकांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने पुरवठा विभागाने आधारकार्ड लिंकिंग नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची शोधमोहिम सुरू केली आहे.

अमरावती : बोगस शिधापत्रिका धारकांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने पुरवठा विभागाने आधारकार्ड लिंकिंग नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची शोधमोहिम सुरू केली आहे. जिल्हास्तरावर या प्रक्रियेला वेग आला असून १५ आॅगस्टपर्यंत या शिधापत्रिकांचा शोध घेण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा विभागासह तहसीलदारांना देण्यात आले आहेत. दरम्यान आधार कार्ड नसलेल्या शिधापत्रिका बोगस ठरणार आहेत. जिल्ह्यात १४ तालुक्यांतून सार्वजनिक वितरण प्रणाली राबविण्यात येणार आहे. पुरवठा विभागाने हायटेक होत याअंतर्गत ग्राहकांना एसएमएस सुविधाही पुरविली आहे. जिल्ह्यात बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, एपीएल आदींचे सुमारे ५ लाख ९२ हजार ४४२ इतके शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये अंत्योदयचे १ लाख २१ हजार ३७२, बीपीएलचे २ लाख ४८ हजार ४५८, एपीएलचे २ लाख ८ हजार ६५३ व १३ हजार ९५९ पांढरे कार्डधारक आहेत. वर्षभरापासून रेशन दुकानदारांमार्फत आधार कार्ड जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र अनेकदा मुदतवाढ देऊनही हे काम रखडत असल्याची स्थिती आहे. पुरवठा विभागाने पहिल्या टप्प्यात आॅनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. बँक खात्यासोबतच आधारकार्ड जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून सध्या जिल्हाभरात तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली आधार लिंकिंगचे काम सुरू आहे. नियुक्त एजन्सीमार्फत हे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांची उदासिनतासर्वेक्षणासाठी नियुक्त रेशन दुकानदारांकडून आधारकार्डची माहिती पुरवण्यात येत नसल्याने या कामाला दिरंगाई होत असल्याची तक्रार एजन्सी चालकांकडून होत आहे. तर ग्राहकांकडून आधारकार्डची माहिती दिली जात नसल्याचे रेशन दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे यांनी सांगितले.नागरिकांकडील आॅनलाईन, आॅफलाईन फिडिंग केलेल्या आधारकार्ड तपासणीचे काम सुरू आहे. यासह डेटा अपडेट करण्यासह नोंदणी दरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे कामही वेगात सुरू आहे. तहसील कार्यालयांना यासंबंधीच्या सूचनाही दिल्या आहेत.- डी.के.वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी