शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

जिल्हानिहाय पीक कर्जाचे दर ठरणार जानेवारीत

By admin | Updated: December 30, 2015 01:23 IST

सन २०१६-१७ मधील पिकांच्या उत्पादनासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर

राज्यस्तर समितीचे ठरले दर : जिल्हा बँक बोलाविणार बैठकअमरावती : सन २०१६-१७ मधील पिकांच्या उत्पादनासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर शासनाच्या राज्यस्तरीय समितीमार्फत निश्चित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय तांत्रिक समित्याद्वारा जानेवारी २०१६ मध्ये पीककर्ज दराची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बैठक बोलाविण्यात येणार आहे. शासनाचे ८ जून २०११ आणि ५ मे २०१४ रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीककर्जामध्ये दरवर्षी आवश्यकतेनुसार वाढ सुचविण्यासाठी व कर्जवाटप प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार १ आॅक्टोबर २०१५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या सभेत २०१६-१७ या वर्षात विविध पिकांच्या उत्पादनासाठी बँकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील खरीप-रबी पिकासह भाजीपाला, फुल पिके, फळपिके, फळझाडे अशा एकूण ७० पिकासाठी पिकनिहाय कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर येत्या एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हानिहाय अंमलबजावणीचे नियोजन जिल्हा तांत्रिक समित्याद्वारा येत्या जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे. यात राज्यस्तर समितीने निश्चित केलेल्या पीक कर्जाच्या दराव्यतिरिक्त १० ते १५ टक्क्यापर्यंत वाढीव दर ठरविण्याबाबत जिल्हा तांत्रिक समित्यांना मुभा राहणार आहे. मात्र राज्यस्तर समितीने ठरविलेल्या दरापेक्षा जिल्हा तांत्रिक समित्यांना पीक कर्जाचे दर कमी करता येणार नाही, असे निर्देश आहेत. (प्रतिनिधी)राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेले पीककर्जाचे दर खरीप ज्वारी (बागायत) २६ हजार रूपये, खरीप ज्वारी (कोरडवाहू) २४ हजार रुपये, तूर (बागायत) ३० हजार रूपये, तूर (कोरडवाहू) २८ हजार रूपये, मूग (जिरायती, उन्हाळी) प्रत्येकी १८ हजार रूपये, सोयाबीन ३६ हजार, कापूस (बागायत) ४४ हजार रूपये, कापूस (जिरायत) ३६ हजार रूपये, गहू (बागायत) ३३ हजार रूपये, हरभरा (बागायत) २७ हजार रूपये, हरभरा (जिरायत) २२ हजार रूपये असे हेक्टरी दर आहेत.