शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांची जन्मभूमी ते कर्मभूमी रस्ता खड्ड्यांनी ‘समृद्ध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:01 IST

मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता जड व अवैध वाहतुकीच्या वजनाने खाचखळग्यांनी समृद्ध झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रसंतांच्या दोन्ही पावन स्थळांना भेटीस येणाºया गुरुदेवभक्तांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरला आहे.

ठळक मुद्देअनास्था : गुरुदेवभक्तांकडून रस्ता दुरुस्तीची अपेक्षा, प्रशासनाचे दुर्लक्ष, तालुक्याच्या वादात दुरवस्था

गुरूकुंज (मोझरी) : मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता जड व अवैध वाहतुकीच्या वजनाने खाचखळग्यांनी समृद्ध झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रसंतांच्या दोन्ही पावन स्थळांना भेटीस येणाºया गुरुदेवभक्तांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरला आहे.अमरावती तालुक्यात येणाºया यावली शहीद या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळी दररोज गुरुदेवभक्तांची रेलचेल असते. येथूनच गुरुदेवभक्त राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीला भेट देण्याकरिता जातात. त्या ठिकाणी महासमाधी, प्रार्थना मंदिर, ध्यानयोग मंदिर, दास टेकडी आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. या दोन्ही गावांना जोडणाºया रस्त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो. नववर्ष आणि हिवाळा याचा संयोग साधून अनेक पर्यटक आणि भविक भक्त या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेटी देत आहेत.यावली शहीद ते गुरुकुंज मोझरी रस्त्याची नेहमीच डागडुजी करण्यात येते. पण, त्याने रस्ता गुळगुळीत न होता, संपूर्ण रस्ताच खाचखळग्यांचा झाला आहे. या स्त्याचे नूतनीकरण करून भाविकांची गैरसोय टाळण्याची मागणी होत आहे. गौण खनिज वाहतुकीने रस्त्याचे वाभाडे निघाले आहेत. दररोज शेकडो ट्रकच्या माध्यमातून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची दिवसा व रात्रीदेखील ओव्हरलोड वाहतूक होते. याच रस्त्याने अवैधरीत्या पाळीव जनावरांची वाहतूक, लाकूडफाटा यांची वाहतूक बिनबोभाट होते. त्यामुळे खºया अर्थाने रस्त्याची वाताहत झाली. या रस्त्याची दुरुस्ती विनाविलंब व्हावी, अशी अपेक्षा आहे.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी ही तिवसा तालुक्यात येते, तर कर्मभूमी अमरावती विभागात येते. आमच्या हद्दीतील अडीच किलोमीटर रस्ता उत्तम असून, गुळगुळीत आहे- दिनकर माहोरे,उपविभागीय अभियंता,तिवसाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीपर्यंत येणारा रस्ता उत्तम असावा, याबाबत दोन्ही सरपंचांचे एकमत आहे. ५० व्या पुण्यतिथीआधी हे काम पूर्ण झाले नाही, ही खेदाची बाब आहे.- पांडुरंग मक्रमपुरे,सरपंच, गुरुदेवनगर