शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण मुलीवर बलात्कार, ५ वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: July 21, 2014 23:37 IST

खरबी (मांडवगड) गावातील एका मनोरुग्ण मुलीवर बलात्कारप्रकरणी सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ ने आरोपीला ५ वर्षांच्या सक्तमजुरी शिक्षा ठोठावली आहे. मिलिंद महादेव बनसोड (३६,रा.खरबी, मांडवगड)

खरबी येथील घटना : २१ हजार रुपयांचा दंडअमरावती : खरबी (मांडवगड) गावातील एका मनोरुग्ण मुलीवर बलात्कारप्रकरणी सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ ने आरोपीला ५ वर्षांच्या सक्तमजुरी शिक्षा ठोठावली आहे. मिलिंद महादेव बनसोड (३६,रा.खरबी, मांडवगड) याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.याबाबत न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, खरबी गावातील एक २८ वर्षीय मनोरुग्ण तरुणी २९ आॅगस्ट २०११ रोजी गावाबाहेर शौचास गेली होती. यावेळी तिचा पाठलाग करीत गावातील आरोपी मिलिंद बनसोड हा लगट साधण्याच्या बेताने तिच्याजवळ गेला होता. पीडित मुलीला मदतीचा निर्णयआरोपीने त्या मनोरुग्ण तरुणीवर अतिप्रसंग केल्याचे गावातीलच रहिवासी चंदा सोनोने व शांता मानकर या दोन्ही महिलांनी पाहिले. त्यांनी तत्काळ गावाकडे धाव घेऊन या घटनेची माहिती पीडित मुलीचा भाऊ मनोहर रामचंद्र बावने याना दिली. पीडित मुलीच्या भावाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अन्य गावकऱ्यांची उपस्थिती होती. मनोरुग्ण बहिणीवर अत्याचार होत असल्याचे दृष्य पाहून मनोहर यांनी आरोपीला चोप देण्यात आला. या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना देण्यात आल्यावर त्यांनी तळेगाव दशासर पोलिसांना ही माहिती दिली व आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी मिलींद बनसोडविरुध्द भादंवीच्या कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी सुधाकर इंगळे यांनी करुन दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. पीडित मुलगी मानसिक आजारी असल्याची शहानिशा न्यायालयाने केली. याप्रकरणी सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून सोमवारी दुपारी न्मिलींद बनसोड याच्यांविरुध्द शिक्षेची तरतुद केली. जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र.१ चे एस.एल.आणेकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांची सक्तमजुरी व २१ हजारांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. ठोठावण्यात आलेल्या २१ हजारांच्या दंडापैकी २० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सरकारी पक्षाची बाजू अ‍ॅड. सुनील देशमुख यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)