शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मोझरी गणात काँग्रेसच्या रंजना पोजगे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:58 IST

मोझरी पंचायत समिती गणाच्या रिक्तजागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रंजना सतीश पोजगे विजयी झाल्यात.

ठळक मुद्देयशोमतींचे वर्चस्व पुन्हा सिद्ध : भाजप दुसºया, ‘लढा’ तृतीय क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : मोझरी पंचायत समिती गणाच्या रिक्तजागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रंजना सतीश पोजगे विजयी झाल्यात. त्यांना ३ हजार ८२७ मते मिळालीत. त्यांनी भाजपच्या अश्विनी सुनील बारबुद्धे यांना १ हजार ५३८ मतांनी पराजित केले. यानिवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात होते.रविवारी या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली व अवघ्या ३० मिनिटांत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. गौरी संजय देशमुख या जि.प.निवडणुकीत निवडून आल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसच्या विजयी उमेदवार रंजना पोजगे यांच्या पाठोपाठ भाजपच्या अश्विनी बारबुद्धे यांना २ हजार २८९ मते तर लढा संघटनेच्या स्वाती बेले यांना २ हजार १२९ मते मिळालीत. विशेष म्हणजे १२० मते ‘नोटा’ ठरली.एकूण १५ केंद्रांवर झालेल्या मतदानात १४ हजार ८७५ मतदारांपैकी ८ हजार ३६५ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ५६.५७ टक्के होती. सोमवारी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी शांततेत पार पडली. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहिम चौधरी व तहसीलदार राम लंके यांनी पाहिले. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.‘लढा’च्या वर्चस्वाला ‘तडा’मोझरी पंचायत समिती गण काँग्रेसच्या स्थानिक आमदार यशोमती ठाकूर यांचा ‘होम सर्कल’ मानला जातो. मात्र, मागील १५ वर्षांपासून येथे काँगे्रस उमेदवारांचा पराभव होत होता. मागील काही वर्षांत लढा संघटनेचे संजय देशमुख यांचे वर्चस्व वाढले होते. मात्र, या पोटनिवडणुकीत लढा संघटनेचा उमेदवार तिसºया क्रमांकावर आल्याने त्यांच्या वर्चस्वाला तडा गेला आहे. तर काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.