शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

रानडुकरांनी केले मूग पीक फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 21:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व कर्जाच्या डोंगरात सापडलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकात रानडुकरांनी हैदोस माजवला आणि साडेतीन एकरातील मूग पीक फस्त केल्याने शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे नव्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.अनिल रामचंद्र थूल (रा. तिवसा) असे ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान : वन्यपशूंचा बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व कर्जाच्या डोंगरात सापडलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकात रानडुकरांनी हैदोस माजवला आणि साडेतीन एकरातील मूग पीक फस्त केल्याने शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे नव्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.अनिल रामचंद्र थूल (रा. तिवसा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे तिवसा हद्दीत अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गानजीक स्व. लालासाहेब महाविद्यालयाजवळ शेत आहे. अनिल थूल यांनी जून महिन्यात ३.५० एकरांत मुगाची पेरणी केली होती. यासाठी त्यांना ५५ हजार रुपये खर्च आला होता. १५दिवसात हे पीक घरात येणार होते. मात्र, त्याआधीच रात्रीच्या वेळेला डुकरांनी उभे मूग पीक फस्त केले. त्यामुळे शेतकºयांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या पिकाला शेतकऱ्यांनी तारेची कुंपणसुद्धा घातले होते. मात्र, हे तारेचे कुंपण रानडुकरांनी तोडून टाकले. तिवसा वनविभागाने या रानडुकरांसह प्राणी, वन्यजिवांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे.आधीच कर्जसदर शेतकºयाकडे तिवसा स्टेट बँकेचे एक लाख रुपये व एचडीएफसी बँकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. आता वन्यपशूंच्या हैदोसाने शेतकऱ्यावर नवे संकट उभे ठाकले आहे.नुकसानभरपाईची मागणीरानडुकरांनी मुगाचे संपूर्ण पीक जमीनदोस्त केले. पीक हाती येत नसल्याने शेतकऱ्याने रागाच्या भरात पिकावर ट्रॅक्टर फिरवला. यालंदर्भात नुकसानभरपाईची मागणी तिवसा वनविभागाकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.तिवसा तालुक्यात अनेक शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस आहे. अलीकडच्या पावसामुळे तरारून आलेले पीक हे वन्यप्राणी फस्त करीत आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे