शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

राणा-ठाकुरांचा झेंडा

By admin | Updated: October 14, 2015 00:11 IST

सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या संजय बंड यांच्या परिवर्तन पॅनेलला आश्चर्यकारकरित्या हादरा देऊन आमदारद्वय रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांनी अनपेक्षित विजयी समीकरण जुळवून आणले.

सुनील वऱ्हाडे सभापती : सहकारचे किशोर चांगोले उपसभापतीअमरावती : सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या संजय बंड यांच्या परिवर्तन पॅनेलला आश्चर्यकारकरित्या हादरा देऊन आमदारद्वय रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांनी अनपेक्षित विजयी समीकरण जुळवून आणले. सत्तेसाठी 'परिवर्तन'मधून 'सहकार'मध्ये कोलांटऊडी घेणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे हे सभापतीपदी विजयी झाले. सहकार पॅनेलच्या किशोर चांगोले यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडली. शुक्रवारनंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर वऱ्हाडे यांनी आ. राणा यांच्या मध्यस्थीने सत्तेचे समीकरण जुळवून आणले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ नंतर सभापती, उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. एक मतपत्रिका कोरीअमरावती : सभापतीपदासाठी संजय बंड यांच्या नेतृत्त्वातील परिवर्तन पॅनेलकडून श्याम देशमुख तर सहकार पॅनेलकडून सुनील वऱ्हाडे तसेच उपसभापतीपदासाठी परिवर्तन पॅनेलकडून प्रवीण भुगूल आणि किशोर चांगोले यांनी नामांकन दाखल केले. दुपारी २ वाजताच्या सुमारास १८ सदस्यीय सभागृहात चिठ्ठ्या टाकून मतदान घेण्यात आले. यात सभापती म्हणून सुनील वऱ्हाडे आणि उपसभापती म्हणून किशोर चांगोले हे १० मते घेऊन विजयी ठरले. परिवर्तन पॅनेलचे श्याम देशमुख आणि प्रवीण भुगूल या उमेदवारांना प्रत्येकी सात संचालकांनी मतदान केले. १८ पैकी एका संचालकाने मतपत्रिका कोरी ठेवल्याने ते मत अवैध ठरविण्यात आले. दुपारी २.३० च्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वऱ्हाडे व चांगोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. बाजार समितीत एकच जल्लोषदुपारी २.३० च्या सुमारास नवनियुक्त सभापती सुनील वऱ्हाडे आणि उपसभापती किशोर चांगोले दालनाबाहेर पडले. आ. रवी राणा, बाजार समितीचे माजी सभापती विलास महल्ले, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. वऱ्हाडे आणि चांगोले यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. आ. रवी राणा हे सकाळी ११ वाजतापासून बाजार समिती आवारात तळ ठोकून होते. वऱ्हाडेंच्या विजयाचे समीकरणआठ सदस्यीय परिवर्तन पॅनेलमध्ये संजय बंड यांनी सभापतीपदासाठी नाना नागमोते यांचे नाव पुढे केले होते. या पॅनेलमधून सुनील वऱ्हाडे हेसुध्दा इच्छुक होते. सभापतीपद मिळणार नाही, याची पुरेपूर खात्री झाल्यानंतर वऱ्हाडे यांनी रवी राणांशी संधान साधले. त्यानंतर आ.राणांनी शुक्रवारी आ. यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा केली. सहकार पॅनेलच्या एका संचालकाला उपसभापतीपद देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर राणा आणि यशोमती ठाकूर यांनी अडते-व्यापाऱ्यांमधील संचालक सतीश अटल, प्रमोद इंगोले अणि हमाल व्यापारी मतदारसंघातील बंडू वानखडे यांना स्वत:कडे वळविले. त्याचवेळी सभापतीपदी सुनील वऱ्हाडे यांचे नाव निश्चित झाले होते. सहकारचे ६, शेतकरी एकता पॅनेलचे मिलिंद तायडे, अडते व्यापारी, हमाल मापारीमधील ३ आणि परिवर्तन पॅनेलमदून वेगळे झालेले सुनील वऱ्हाडे अशा ११ संचालकांचे विजयी समीकरण जुळवून आणले गेले. विलास महल्ले आणि रवी राणा यांनी ही सगळी जुळवाजुळव केली. सहा सदस्य असूनही विरोधी बाकावर बसण्यापेक्षा उपसभापतीपद आणि सत्ता केव्हाही उत्तम, अशी भूमिका ठाकूर यांनी घेतली. परिणामस्वरूप सुनील वऱ्हाडे यांची सभापतीपदाची इच्छा फलद्रुप झाली. वऱ्हाडेंच्या दलबदलूपणाचे मिळाले होते संकेत!१५ सप्टेंबर रोजी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी निवडणूक झाली. १६ ला निकाल लागल्यानंतर परिवर्तन पॅनेलकडून निवडून आलेल्या वऱ्हाडेंसह सतीश अटल, प्रमोद इंगोले, बंडू वानखडे आणि मिलिंद तायडे यांचे जाहीर अभिनंदन राणा दाम्पत्याकडून करण्यात आले. वऱ्हाडे फुटणार असल्याचे ते संकेतच होते. सहकार पॅनेलचे विकास इंगोले, किशोर चांगोले, अशोक दहिकर, उषा वनवे, प्रफुल्ल राऊत, किरण महल्ले, अडते-व्यापारीमधील प्रमोद इंगोले आणि सतीश अटल, हमाली-मापारीचे संचालक बंडू वानखडे आणि राणा समर्थित शेतकरी पॅनेलचे मिलिंद तायडे यांच्यापैकी १० संचालकांनी सुनील वऱ्हाडे आणि किशोर चांगोले यांना विजयी केले. परिवर्तनचे सात संचालक असताना विजयी उमेदवारास ११ मते मिळणे आवश्यक होते. मात्र, ११ पैकी एका संचालकांने मतपत्रिका कोरी सोडली. या सर्व घडामोडीत मिलिंद तायडे एकमेव संचालक असताना शेतकरी एकता पॅनेलचे नेते आ.रवी राणा यांनी वऱ्हाडे यांना सभापतीपद मिळवून देऊन ‘किंगमेकर’ची भूमिका वठविली. संचालक गेले अज्ञातस्थळीसहकार पॅनेलच्या सहा आणि अन्य पाच संचालकांची मदत घेऊन आ. रवी राणा यांनी सुनील वऱ्हाडे यांच्यासाठी सत्तेची मोट बांधली. सहकार पॅनेलच्या सहा संचालकांसह इतर संचालकांची पळवापळवी होऊ नये, यासाठी परिवर्तन व्यतिरिक्त अन्य संचालकांना अज्ञातस्थळी पाठविण्यात आले होते. हे सर्व संचालक सोमवारी उशिरा रात्री शहरात परतले.तोंडचा घास हिरावला१८ सदस्यीय बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी संजय बंड यांच्या नेतृत्त्वातील परिवर्तन पॅनेलला अवघ्या दोन संचालकांची गरज होती. मात्र, त्यातून वऱ्हाडे निसटले आणि सत्तेपासून सर्वाधिक जवळ असलेल्या परिवर्तन पॅनेलच्या तोंडातून सत्तेचा घास हिरावून घेण्यात राणा, यशोमती यशस्वी ठरले. शेतकरी, व्यापारी आणि हमालांसह सर्व घटकांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. विकासासाठी परिवर्तन पॅनेलमधून बाहेर पडलो. यापुढे सर्वंकष न्यायाची भूमिका राहील. - सुनील वऱ्हाडे,नवनिर्वाचित सभापती.सहकारी आणि आमदारद्वयांच्या मार्गदर्शनात शेतकरी हितासाठी लढू. शेतकऱ्यांची कुठलीही नाडवणूक होणार नाही, याकडे लक्ष राहिल. विरोधकांना सोबत घेऊन काम करु. -किशोर चांगोले, नवनिर्वाचित उपसभापती.व्यक्ती जुळवणे हे माझे काम आहे. माझ्या मतदारसंघातील आणि शेतकऱ्यांच्या सर्वाधिक जवळच्या असलेल्या बाजार समितीवर चांगला माणूस नेमला आहे. शेतकरीहिताचे काम होईल. - यशोमती ठाकूर,सहकार पॅनेल.खंडणीबहाद्दरांना दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो. शेतकरी, हमालांना १ रुपयांत जेवण, राहण्याची व्यवस्था, बडनेरा-भातकुली उपबाजार समितीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. - रवी राणा, शेतकरी एकता पॅनेल.