शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात अतिमद्यप्राशनाने रामटेकच्या दोन मजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:40 IST

रायपूर व्याघ्र प्रकल्पाच्या कामावरील घटना : पोलिसांचा तपास सुरू 

चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कर्मचाºयांच्या निवासाच्या कामासाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून आलेल्या दोन मजुरांचा सोमवारी सकाळी अतिमद्यपानाने मृत्यू झाला. तालुक्यातील रायपूर येथील या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.अरविंद बापूराव वाकोडे (३८), नितेश सुखदेवराव टाकसाळे (२५ दोन्ही रा. महात्मा फुलेनगर, रामटेक, जि. नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. एक महिन्यापासून रामटेक येथील जवळपास आठ ते दहा मजूर शर्मा नामक कंत्राटदाराने घेतलेल्या व्याघ्र प्रकल्प कर्मचारी निवास निर्मितीच्या कामावर होते. रविवारी रात्री मजुरांनी रायपूर येथे अतिमद्यपान केले व खिचडीचे जेवण घेतले. सोमवारी सकाळी अरविंद व नितेशचा दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रथमदर्शी पुढे येत आहे. सदर घटनेची माहिती कंत्राटदार शर्मा यांनी पोलिसांत दिली. चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे, सेमाडोह पोलीस चौकीचे सहायक उपनिरीक्षक सुधीर पोटे, पोलीस शिपाई पवन सातपुते यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. अतिदुर्गम रायपूर येथे संपर्कासाठी कुठलीच सुविधा नाही. त्यामुळे वृत्त लिहिस्तोवर अधिक माहिती मिळू शकली नाही. 

विषारी दारू की खिचडी?मजुरांनी रात्री यथेच्छ दारू ढोसल्याची माहिती असून, त्यानंतर खिचडीचे जेवण घेतले. आठपैकी दोनच मजुरांचा मृत्यू झाल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला, यामागे घातपात आहे का, हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. रायपूर येथे कुठल्याच प्रकारची देशी-विदेशी दारूचे दुकान नाही, तर मोहाची गावठी दारू मजुरांनी प्राशन केल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही मजुरांचे मृतदेह सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरापर्यंत आणण्याचे कार्य सुरू होते.

महिन्याभरापासून उपकेंद्र बंदपावसाळ्यात मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा दरवर्षीच फोल ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मेळघाटात बालमृत्यूचे प्रमाण वाढत असतानाही रायपूर येथील उपकेंद्र एका महिन्यापासून बंद असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, भाजपचे महासचिव गोलू मुंडे यांनी केली आहे. आदिवासींसाठी आरोग्य विभाग सुविधा २४ तास फक्त असल्याचा कांगावा केला जात आहे. उपकेंद्रात कुणीच नसल्याने मजुरांना वेळेवर उपचारसुद्धा मिळू शकला नाही, हे विशेष.

उपाशीपोटी अतिमद्यपान केल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या कामावरील दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास चिखलदरा ठाणेदार करीत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यावर सर्व प्रकार स्पष्ट होईल.विशाल नेहूल, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी