कंपासपुरावासीयांचे आरोग्य धोक्यात : मनपा प्रशासन ढिम्मबडनेरा : स्थानिक जुन्यावस्तीतील कंपासपुऱ्यात रामनाला केरकचऱ्यामुळे तुंबला आहे. नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. ही बाब नित्याचीच झाली असून लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपासपुऱ्यातून रामनाला जातो. हा रामनाला उताराच्या भागात आहे. वरच्या भागातील पावसाचे पाणी याच नाल्याद्वारे शहराच्या बाहेर काढले जात आहे. ज्या-ज्या भागातून हा रामनाला जातो त्या भागात अशीच परिस्थिती असते. पावसाळ्यात तर या परिसरातील रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. या रामनाल्याला लागूनच जनावरांचे गोठे आहे. जनावरं पाळणारे गोठ्यातला केरकचरा नाल्यातच सोडून देत असल्याची ओरड आहे. या कचऱ्यामुळे हा रामनाला सारखा भरून राहत आहे. नाला चोक झाल्यावर त्याचे घाण पाणी सरळ रस्त्यावर येत आहे. बऱ्याच दिवसांपर्यंत हे घाण पाणी रस्त्यावर साचूनून राहत असल्यामुळे नागरिकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात तर या परिसरातील लोकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. सार्वजनिक नळांचे स्टॅन्ड देखील या घाण पाण्याच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिक प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन नेहमी होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना दिलासा द्यावा, असे या भागातील नागरिकांनी तळमळ व्यक्त केली आहे. कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांना रामनाल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने रामनाल्यातील तांत्रिक अडचणीची बाब लक्षात घेऊन यात काही बदल करता येते का यावर लक्ष देण्याची गरज आहे. तसेच जनावरे पाळणाऱ्यांना मनपा प्रशासनाने ताकीद द्यावी तेव्हा कुठे या रामनाल्याचे घाण पाणी सरळ निघेल, सद्या रपटा फोडून साफसफाई कर्मचाऱ्यांनी हा रामनाला तात्पुरता मोकळा केला आहे. (शहर प्रतिनिधी)गोडबोले यांच्या राम मंदिरापासून ते मेहरे यांच्या घरापर्यंत हा रामनाला सारखा तुंबलेला असतो. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे.- गजानन मोहोड, नागरिक.रामनाल्याच्या घाण पाण्यामुळे या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी याची दखल घ्यावी व आम्हाला होणारा त्रास दूर करावा.- राजू देशमुख, नागरिक.
रामनाला ओव्हरफ्लो
By admin | Updated: June 24, 2015 00:36 IST