शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रुक्मिणीच्या माहेरी आज रिंगण, उद्या महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:49 IST

रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापुरात रविवारी शासकीय महापूजा होणार आहे. त्यापूर्वी शनिवार, ४ नोव्हेंबरला कुºहा रिंगण सोहळा रंगणार आहे.

ठळक मुद्देवैष्णवांची मांदियाळी : कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापुरात रविवारी शासकीय महापूजा होणार आहे. त्यापूर्वी शनिवार, ४ नोव्हेंबरला कुºहा रिंगण सोहळा रंगणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने वैष्णवजन शुक्रवारीच कौंडण्यपुरात मोठ्या संख्येने दाखल झाले.भगवान श्रीकृष्णाची पत्नी देवी रुक्मिणीचे माहेर म्हणून कौंडण्यापूर नावारूपास आले आहे. येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव दहा दिवस भरतो. कार्तिक पौर्णिमेला अडीच दिवसांच्या मुक्कामाला पंढरीचा विठ्ठल येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे पंढरपूरप्रमाणेच कौंडण्यापुरात मोठी कार्तिक यात्रा भरते. लाखो वारकरी दहा दिवसांत येथे येतात. यानिमित्त कुºहा येथे ४ नोव्हेंबरला दिंड्यांचा रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात ५० ते ६० दिंड्या सहभागी होणार आहेत. कुºहा ते तिवसा मार्गातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय नजीकच्या भव्य प्रांगणावर हा रिंगण सोहळा होईल. यानंतर या दिंड्या कौंडण्यपुराकडे प्रस्थान करतील. रात्री मोठ्या संख्येत भाविक त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतील.कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थांनात ५ नोव्हेंबरला पहाटे ६ वाजता पालकमंत्री, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा होईल. सायंकाळी ५ ला गोकुळपुरीत दहीहंडी होणार आहे.मुख्यमंत्र्यांनी यावे, भाविकांची इच्छामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे सपत्नीक पंढरपूरला शासकीय महापूजा करतात, त्याप्रमाणे कौंडण्यापुरातदेखील शासकीय महापूजा व्हावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर व वारकºयांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. २०१३ पासून शासकीय महापूजा होते, मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली नाही. ती व्हावी, अशी मागणी भाविक करीत आहेत.