सतीश बहुरुपी ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुराबाजार : परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला. त्यामुळे राजुराबाजार येथील प्रसिद्ध मिरची बाजारातील आवक ८७ टक्क््यांनी घटली आहे. व्यापाºयांकडून दर वाढविण्यात आले असले तरी उत्पादन घटल्याने शेतकºयांना त्याचा फायदा मिळविता आलेला नाही.कुणाच्या डोळयातून अश्रू तर कुणाच्या तोंडाला पाणी सोडणारी राजुराबाजारची हिरवी मिरची प्रसिद्ध आहे. बाजारात दररोज तीन हजार क्विंटल मिरचीची आवक होत असल्याची नोंद बाजार समितीने यापूर्वी घेतली आहे. तथापि, यंदा अल्प उत्पादनामुळे दररोज केवळ ४०० क्विंटल मिरची बाजारात विक्रीस येत आहे. दर २० ते २२ रुपये किलोप्रमाणे मिळत असताना शेतकºयांकडे मिरची नाही. यामुळे शेतकºयांचे हिरवे स्वप्न भंगले, तर व्यापारी आणि मजुरांनासुद्धा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे मिरची बाजारपेठेवर अवकळा पसरली आहे.अनेकांना मिळतो रोजगारराजुराबाजार येथील उपबाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ आहे. हंगामामध्ये दिवसागणीक २० ते २५ हजार रुपयांपर्यंत सेस बाजार समितीला मिळतो. येथून परप्रांतात मिरची पाठविताना वेळेचे बंधन असल्याने वाहतूकदारांना वाहनचालकांना बक्षिसाची संधी असते.रात्रीची बाजारपेठनाशंवत माल असल्याने मिळेल त्या भावात विकण्याची शेतकºयांची मानसिकता असते. राजुराबाजारची ही रात्रभराची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथून देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. पाकिस्तान, बांग्लादेश, अरब राष्ट्रांसह अनेक देशांमध्ये मिरची निर्यात होते.नगदी पीक म्हणून मिरची नावारूपास आली. परंतु, सतत तीन वर्षांपासून अज्ञात रोगामुळे उत्पादनात कमालीची घट येत आहे. यावर्षी दर तेजीत आहेत. पण, आवक कमी असल्याने शेतकºयांना फायदा नाही.- अनिल चांडक,मिरची व्यापारी
राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:09 IST
परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला.
राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले
ठळक मुद्देपरदेशात मागणी : दर तेजीत, आवक नगण्य; हजारो कामगारांना फटका