शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरू

By admin | Updated: February 20, 2017 00:03 IST

येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवटेकडीवर रविवारी सकाळी १० वाजता शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

श्रीमंत कोकाटे यांचे प्रतिपादन : शिवटेकडीवर शिवजयंतीचा जल्लोषअमरावती : येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवटेकडीवर रविवारी सकाळी १० वाजता शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी यावेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्र्यावर दीड तास अभ्यासू मार्गदर्शन केले. शिवचरित्रातील अनेक घटना सद्यस्थितीशी सांगड घालून ओघवत्या शैलीत मांडल्या. ते म्हणाले, शिवरायांनी स्वराज्यात महिलांची सुरक्षा प्राधान्याने केली. शिवरायांनी सामाजिक पुरोगामित्व जपण्याचा कसोशिने प्रयत्न केला. लढताना धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सन्मानजनक पुनर्वसन त्यांनी केले.म्हणून घडले छत्रपती शिवाजीअमरावती : ते कधीही अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या नादी लागले नाहीत. त्यांनी ही शिकवण त्यांच्या आईसाहेबांकडून घेतली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ याच होत्या. त्यांच्या संस्कारातूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले. क्युबा, व्हिएतनाम सारख्या देशांनी अमेरीकेविरूद्ध लढताना शिवरायांपासून प्रेरणा घेतल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या अभ्यासू भाषणातून केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण व पूजन करण्यात आले. याठिकाणी हिंदू विद्यापीठाचे विभागप्रमुख सतीश पावडे, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेकर, सांख्यिकी अधिकारी वर्षा भाकरे, गोविंद लाहोटे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी सतीश पावडे, संजय बाहेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रकांत मोहिते यांनी केले. विद्यार्थ्यांनी यावेळी रॅलीदेखील काढली. यावेळी त्यांनी शिवकालीन वेशभूषा साकारली होती. पंचवटी चौकातूनदेखील रॅली काढण्यात आली. (प्रतिनिधी)