अमरावती : येथे शहर पोलीस आयुक्तपदी राजकुमार व्हटकर यांचे नियुक्तीचे आदेश शनिवारी धडकले असून ते लवकरच रुजू होण्याचे संकेत आहे.राजकुमार व्हटकर हे १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मुंबई येथील सीबीआय विभागात तीन वर्षे व त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही ते कार्यरत होते. मध्यतंरी या पदावर सोळूंके यांची नियुक्ती झाल्याची चर्चा होती. मात्र त्यांची बदली आता पुणे येथे झाल्याची माहिती आहे. राजकुमार व्हटकर हे आतापर्यंत नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. मात्र, नुकतेच त्यांना अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्तांचा पदभार देण्यात आला आहे. गृहविभागाचे आदेश शनिवारी अमरावती पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत.
राजकुमार व्हटकर अमरावतीचे नवे 'सीपी'
By admin | Updated: June 7, 2015 00:31 IST