४१ कोटींच्या निविदा २५ टक्के जास्त दर : कंत्राटदारांना वाटाघाटीसाठी बोलविणारअमरावती : स्थानिक राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर साकारल्या जाणाऱ्या उड्डाणपूल निर्मितीसाठी ४१ कोटी रुपयांची निविदा प्राप्त झाली आहे. ही निविदा ठराविक रक्क मेपेक्षा २५ टक्के जास्त दराने प्राप्त झाली असून संबंधित कंत्राटदारांना वाटाघाटीसाठी बोलावून प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आहे.काही वर्षांपासून राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल निर्मिती मागणी आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या पुढाकाराने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ई निविदेनुसार ही प्रक्रिया पार पाडताना पाच कंत्राटदारांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सोमवारी निविदा उघडण्यात आल्यात. यामध्ये नागपूर येथील चाफेकर अँड कंपनीने सर्वात कमी किंमतीचे ४१ कोटी, ६ लाख, ३८ हजार, २३८ रुपये ७६ पैसे एवढ्या रक्कमेची निविदा टाकली होती. एकूण पाच निविदा तपासल्या असता चाफेकर कंपनीची सर्वात कमी रक्कमेची निविदा निदर्शनास आली. त्यामुळे आयुक्त गुडेवार, महापौर चरणजितकौर नंदा यांनी चाफे कर यांना उड्डाणपुलाचे काम सोपविण्याचा निर्णय घेतला. खरे तर प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया राबविली तेंव्हा राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचे दर निविदेत ३२.६३ कोटी ठरविले होते. पंरतु बांधकाम साहत्यिाचे दर वाढल्याने पाचही निविदाकर्त्यांनी २५ ते ६० टक्के जास्त दराने निविदा टाकल्या होत्या. सोमवारी ही निविदा प्रक्रिया आटोपली असून संबंधित कंत्राटदारांशी करारनामा करुन राजापेठ उड्डाणपुलाचे काम सोपविले जाईल. अनेक वर्षांपासून राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्माण होणार की नाही, याबाबत संभ्रम असताना महापालिका प्रशासनाने प्रयत्न करुन निविदा प्रक्रियेला पहिला टप्पा गाठला आहे. बडनेरा मार्गावर राजापेठ पोलीस ठाण व मंत्री मोटर्स, शंकरनगर, दस्तूरनगर व बेलपुरा मार्ग असे पाच वळण मार्ग या उड्डाणपुलाला राहणार आहेत. मंजूर डिझाईनमध्ये पाच अप्रोच रस्ते असल्यामुळे राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मुक्तता मिळेल, ही सत्यता आहे. (प्रतिनिधी)
राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या
By admin | Updated: July 21, 2015 00:08 IST