शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचा जिल्हाकचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:53 IST

मोर्शी तालुक्यातील शिरखेडचे ठाणेदार नितीन चव्हाण यांनी जाणीवपूर्वक चुकीची कारवाई केल्याने त्यांना तत्काळ निलंबित करावे, .....

ठळक मुद्देनिवेदन : शिरखेडच्या ठाणेदाराला निलंबित करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी तालुक्यातील शिरखेडचे ठाणेदार नितीन चव्हाण यांनी जाणीवपूर्वक चुकीची कारवाई केल्याने त्यांना तत्काळ निलंबित करावे, यासह इतर मागण्यांसाठी गुरूवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले आहे.१४ सप्टेंबर रोजी कमलताई गवई, जिल्हा संघटक अमोल इंगळे, दीपक सरदार यांच्या नेतृत्वात इर्विन चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडगाव येथील स्वप्निल बनसोड नामक विद्यार्थ्याला ठाणेदार नितीन चव्हाण यांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय द्वेष भावनेतून गावगुंड ठरवून त्याचा तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी तळवी यांच्याकडे पाठविला असता तोच प्रस्ताव उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांच्याकडे पाठवून सी.आर.पी.सी कलम १४४ नुसार तडीपारीचा आदेश दिला. स्वप्निल हा पत्रकारिता पदविकेचा विद्यार्थी असून त्यावर पोलीस ठाण्याअंतर्गत कोणताही दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद नाही. त्यामुळे तडीपारीचा आदेश हा चुकीचा असून विद्यार्थ्याचे जीवन बर्बाद करणारा आहे. चुकीच्या पद्धतीने केलेला आदेश लक्षात घेता असे यापूर्वी प्रकार केल्याचा आरोप रिपाइंच्यावतीने करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाला दोषी असलेल्या ठाणेदार नितीन चव्हाण, एसडीपीओ तडवी, एसडीओ कडू या तीनही अधिकाºयांना निलंबित करावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करावी, मुस्लीम समाजावर होणारा अन्याय दूर करावा, शेतकºयांना स्वाभिनाथन आयोग लागू करावा, महापालिका घरकूल योजनेत द्रारिद्ररेषेखालीत प्रमाणपत्राची अट रद्द करावी, अशी मागणी कमलताई गवई यांनी केली. दरम्यान यासंदर्भात योग्य कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.आंदोलनात मनोज वानखडे, राहुल भालेराव, सविता भटकर, गणेश तेलगोटे, गौतम मोहोड, संजय गायकवाड, आतिष डोंगरे, शुभम बोरकर, प्रमोद गवई, राजेंद्र जोशी, प्रशांत वाकोडे, करूण गायकवाड आदीसह मोठ्या संख्यने नागरिक सहभागी झाले होते.