शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पावसाच्या तुटीचा अंबानगरीला फटका; अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ ६१ टक्के जलसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:10 IST

वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६ टक्के झालेली पावसाची नोंद आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा पहिला फटका अमरावती शहराला बसला आहे.

अमरावती, दि. 11 - वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६ टक्के झालेली पावसाची नोंद आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा पहिला फटका अमरावती शहराला बसला आहे. ७ लाख लोकसंख्येच्या महानगराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला असून त्याची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महानगरातील १७ जलकुंभांना दोन झोनमध्ये विभागण्यात आले आहेत.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत ८१४.५ मी.मी. पाऊस  अपेक्षित असतो. मात्र, या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६.४ टक्के अर्थात ४५९ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. कमी पर्जन्यमानामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया आणि जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या अप्परवर्धा प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी आहे. अप्पर वर्धा धरणात पिण्याच्या पाण्याकरिता ५८ दलघमी वार्षिक मंजूर आरक्षण आहे. सन २०१७-१८ मध्ये ते ४४ दलघमी असे निश्चित करण्यात आले आहे. शहराच्या सध्याच्या ७ लाख लोकसंख्येस प्रतिदिन १३५ प्रतिलीटरप्रमाणे १२७ दशलक्ष लीटर्स पाणी हवे आहे. तूर्तास ९५ दशलक्ष मीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या शहरात सुरू असलेला पाणीपुरवठा अप्परवर्धा प्रकल्पातून २४ तास पंपिंगद्वारे सुरू आहे. प्रकल्पाची पातळी कमी झाल्यास पंपाची उपसाक्षमता कमी होईल, असे निरीक्षण मजीप्राने नोंदविले आहे. याशिवाय अमृत योजनेमधील कामे पूर्ण होईपर्यंत शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मजिप्राने घेतला आहे. तसा पत्रव्यवहार महापालिकेशी करण्यात आला आहे. अमृत योजनेमधील कामाची कुर्मगती आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित जलसाठा लक्षात घेऊन अमरावती शहराला ११ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित जलसाठा, सिंभोरा येथून होणा-या पंपिंगमध्ये खंडित वीजपुरवठयाचा अडसर आणि अमृत योजनेतील कामांमुळे महानगराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून करण्यात आली.- सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता, मजीप्रा, अमरावती

महापालिका क्षेत्रात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मजीप्राने महापालिका प्रशासनाला कळविला आहे. त्यानुसार महानगरातील जलकुंभांचे दोन झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून झोन क्रमांक १ मध्ये सोमवारी तर झोन क्रमांक २ मध्ये मंगळवारी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका