हवामान तज्ज्ञांचा अंदाज : सोमवारनंतर तापमानवाढीचे संकेतअमरावती : राज्याच्या तुलनेत विदर्भातील तापमानात किचिंत घट झाली आहे. ढगाळ वातारवण व भर उन्हाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ९ मे रोजी पुन्हा पावसाची शक्यता असून सोमवारनंतर तापमानवाढीचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. कोकण-गोवा व मध्य-महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. त्यातच वादळी वाऱ्यासह विजेच्या गडागडाटात पावसाने हजेरी लावल्याने थोडी उन्हाची तीव्रता कमी जाणवली आहे. मात्र, भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याने नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनले आहे. ७ मे रोजी हवामान कोरडे राहण्याचे संकेत असून ८ मे रोजी मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ९ रोजी मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. (प्रतिनिधी)
९ मे रोजी पुन्हा पाऊस !
By admin | Updated: May 6, 2015 23:59 IST