शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे थांबणार रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:39 IST

महानुभावपंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर या गावात दोनशेच्या जवळपास तीर्थस्थान आहेत. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून येणारे लाखो भक्त रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे नरखेड पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा श्रीक्षेत्र रिद्धपूर प्लॅटफॉर्मवर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामपंचायत व ग्रामवासीयांच्यावतीने येथील प्लॅपफार्मवर श्रीमद् भगवत गीता शांतीपाठ गायन करून शांततेत रेल रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देश्रीमद् भगवद्गीता शांतीपाठ गायन : रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी/रिद्धपूर : महानुभावपंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर या गावात दोनशेच्या जवळपास तीर्थस्थान आहेत. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून येणारे लाखो भक्त रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे नरखेड पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा श्रीक्षेत्र रिद्धपूर प्लॅटफॉर्मवर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामपंचायत व ग्रामवासीयांच्यावतीने येथील प्लॅपफार्मवर श्रीमद् भगवत गीता शांतीपाठ गायन करून शांततेत रेल रोको आंदोलन करण्यात आले.रिद्धपूर येथील शेतकऱ्यांना शेतमाल मोठ्या शहरात विकण्यास नेण्यासाठी रेल्वे थांबा नसल्याने अडचण भासत आहे. तथापि, देवदर्शनासाठी देशभरातून येणाºया भाविकांनासुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांनी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार स्वत: श्रमदान करून कच्चा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पॉट निरीक्षण करून समाधान व्यक्त केले होते. त्यानुसार रिद्धपूर येथे रेल्वे थांबा देण्यात येऊन रेल्वे गाडी थांबविण्याची मागणी झाली. परंतु, रेल्वे प्रशासनाच्यावतीने कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेवटी श्री गोविंदप्रभू तीर्थस्थान समिती व रिद्धपूर ग्रामवासियांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन शुक्रवार १४ डिसेंबर रोजी तीर्थ सेवा समितीचे वार्इंदेशकर बाबा, प्रमोददादा अमृते, तळेगावकर बाबा, प्रमोद हरणे, रिद्धपूरचे सरपंच गोपाल जामठे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर, सचिन डवके, सुरेश सवई, राजेश डरंगे, गजानन पोहोकार, पाचराऊत बाबा, विश्वनाथ बाबा, डोळसकर बाबा, राहुल दादा, दयालमुनी बाबा, महेकराज बाबा, सायराज बाबा, वामनराव चरपे, रामभाऊ श्रीराव, महेश मुंदडा व गावातील नागरिक यांच्या नेतृत्वात श्रीमद् भगवतगीता शांतीपाठ गायन करून रेल्वे रोको आंदोलन करत असताना नागपूर येथील वाणिज्य प्रबंधक वानखडे यांनी सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून सांगितले की, सीसीएम मोठ्या अधिकाºयांची या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे रेल्वे प्लॅटफार्म तयार करण्याकरिता सीसीएम या रेल्वे अधिकाºयांची प्रस्तावावर स्वाक्षरी करून दिल्लीला पाठविण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे लवकरच रेल्वे प्लॅटफार्म तयार होऊन रेल्वे थांबासुद्धा देण्यात येणार आहे, असे नागपूर येथून आलेले वाणिज्य प्रबंधक वानखडे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले असता, आंदोलनकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये गावातील नागरिकांनी व महंतांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.