शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची ट्रॅक सुरक्षा मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:47 IST

रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.

ठळक मुद्देअपघात रोखण्यासाठी उपाययोजना : मध्य रेल्वे भुसावळ विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.गेल्या काही वर्षांत रेल्वे गाड्यांच्या अपघातांनी प्रवाशांचे नाहक जीव गमवावे लागल्याने रेल्वे मंत्रालय टिकेची धनी ठरले. मात्र, रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाच वर्षांच्या तुलनेत गत एका वर्षांत रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ ला कालावधीत केवळ ४० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी बघता रेल्वे सुरक्षा रूळावर येत असल्याचे मानले जात आहे. मात्र, रेल्वे गाड्यांचा अपघात होऊ नये,यासाठी रेल्वेने नव्याने ट्रॅकची बांधणी चालविली आहे. जुने रूळ बदलविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालले आहेत. काही रूळ खासगी कंपनीमार्फत यंत्राद्वारे बदलविले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जात आहे. मुख्य रेल्वे मार्गावर रूळांबाबत कोणतीही समस्या, प्रश्न असल्यास संबंधित अधिकाºयांकडून त्वरेने सोडविली जात आहे. ट्रॅकचे सुरक्षेबाबत प्रशिक्षण आणि सुरक्षा यंत्रणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गँगमनकडे विशेष मोहीम म्हणून काही स्वतंत्र चमू तयार करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी रूळांचे सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. रात्रीला गँगमनने किमान २१ किमी.पर्यंतचे पायदळ सुरक्षावारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.पुलांवरील ट्रॅक सुरक्षेवर विशेष लक्षआतापर्यंत रेल्वे गाड्यांचे अपघात हे पुलांवर सर्वांत जास्त झाले आहेत. त्यामुळे रेल्वे रूळांवरील जुने, नवीन पुलांची दुरुस्ती, डागडुजीला प्राधान्य देण्यात येत आहे. या कामाने वेग घेतला आहे. ट्रॅकच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही उणिवा असणार नाही, याची जबाबदारी वरिष्ठ विभागीय अभियंता (पीआयडब्ल्यू) या विभागाकडे सोपविण्यात आली आहे.रेल्वे रूळांच्या सुरक्षेबाबत सतत सतर्कता बाळगली जाते. गँगमनकडे विशेष जबाबदारी आहे. २१ कि.मी.पर्यंत पायी चालून गँगमन रूळांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेत आहे. काही ठिकाणी आम्ही जातो. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.- यू. पी. पटेल, वरिष्ठ विभागीय अभियंता, बडनेरा