शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे खलाशाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:29 IST

रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देशोककळा : सातुर्णा स्थित अंबा मगलम्मागील रेल्वे रुळावर घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.अनूप श्रीवास पत्नी व तीन महिन्यांच्या मुलासह साईनगरस्थित खंडेलवाल नगरात राहत होता. अमरावती रेल्वेस्थानक येथे तो खलाशी पदावर कार्यरत होता. रविवारी रात्री अनूप हा महावीर नगरात दुर्गाेत्सव मंडळाच्या महाप्रसाद कार्यक्रमाकरिता गेला होता. कार्यक्रम आटोपून तो ड्युटीवर जाण्यासाठी रात्री उशिरा निघाला. दरम्यान अनूप हा सातुर्णाजवळील अंबा मंगलम् कार्यालयामागील रेल्वे रुळ ओलांडून सातुर्णा स्टॉपवर येत होते. दरम्यानच रेल्वे रुळ ओलांडताना अमरावतीहून बडनेराकडे जाणाऱ्या रेल्वेचा धक्का अनूपला लागला. अनूप घटनास्थळीच मृतावस्थेत पडून होता. याची माहिती रात्री १ वाजता राजापेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात नेले.सोमवारी सकाळी अनूपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.कुटुंबीयांचा आक्रोशअनूप हा आनंदी व सुस्वभावी असल्यामुळे त्याचे चाहते व मित्र मंडळीत तो आवडता होता. अनुप हा एकुलता एक असल्यामुळे कुटुंबीयांचा आधारवड होता. आई-वडिल, पत्नी एक तीन महिन्याचा मुलगा व तीन ते चार वर्षांची मुलगी असा अनूपचा परिवार आहे.अनूपच्या मृत्यूमुळे श्रीवास कुटुंबीयांवर दुखाचे डोंगर कोसळले असून, अंत्यविधीवेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.