अमरावती : बडनेरा पोलिसांनी जुगारावर धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह तीन दुचाकी, पाच मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २ लाख ६१ हजार १० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मेेघे महाविद्यालयाच्या मागे म्हाडा कॉलनीजवळील राजू इखार यांच्या शेताच्या बांधावर सोमवारी करण्यात आली.
शेख नाजीम शेख रहीम (२६), शेख शहजाद शेख असलम (२७), शेख नदीम शेख करीम (२०), शेख फईम शेख रहीम (२५, चारही रा. गवळीपुरा), संजू राजू पवार(२५, रा. माताफैल, जुनी वस्ती), अतुल ठाकरे ( रा. जुनी वस्ती, बडनेरा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला. आरोपीच्या ताब्यातून महागड्या दुचाकी व पाच मोबाईल जप्त करण्यात आल्या. यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर एक पसार झाला आहे.