शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रहमानला अटक, हत्येचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:48 IST

सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुनील गजभियेच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री खामगावातून अटक केली. रहमान इब्राहिमखान पठाण (४१,रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याच्या चौकशीनंतरही शीतलच्या हत्येचे गूढ कायम आहे.

ठळक मुद्देशीतल पाटील हत्याकांड : १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतअमरावती : सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुनील गजभियेच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री खामगावातून अटक केली. रहमान इब्राहिमखान पठाण (४१,रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याच्या चौकशीनंतरही शीतलच्या हत्येचे गूढ कायम आहे.रहमानला न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पर्यंतची पोेलीस कोठडी सुनावली आहे.शीतलचा मृत्यू डोक्याच्या आत मार लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात आहे. तीची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकण्याचा आल्याचा संशय पोलिसांना आहे.रहमानला तीन दिवसांचा पीसीआरशीतल पाटील यांची आत्महत्या की घातपात याचा शोध लावताना पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रहमानला खामगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. रहमान हा घटनेच्या दिवशी गजभिये व शीतलसोबत होता. चांदूरबाजारला जाण्यापूर्वी रहमानने गजभिये व त्याचा मोबाईल घरी नेऊन ठेवला.त्यानंतर तिघेही चांदूरबाजार मार्गे गेले. रात्री उशिरा तिघेही कारने एक्सप्रेस हायवेकडे येत असताना गजभिये व शीतल यांच्यात वाद सुरूहोते. विहिरीजवळ गजभियेने कार थांबविली. त्यानंतर शीतल व गजभिये खाली उतरून विहिरीजवळ गेले. त्यावेळी रहमान कारमध्ये बसून होता. विहिरीकडून शीतलच्या ओरडण्याचा व विहिरीत दगड पडल्यासारखा आवाज आला आणि त्यानंतर शीतलने आत्महत्या केल्याचे गजभियेने रहमानला सांगितले. तेथून गजभियेने रहमानला घरी सोडून दिले. असे बयाण रहमानने पोलिसांना चौकशीअंती दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रहमान एका ट्रकमधून मूर्तिजापूरपर्यंत गेला. तेथील चुलत भावाकडून मोबाईल सिम घेतले आणि मुंबई येथील हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी गेला. तेथून गुजरात, अजमेर, इंदूर, बऱ्हाणपूर प्रवास केल्यानंतर तो खामगावला आला. खामगावच्या रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या एका परिचित व्यक्तीच्या घरी रहेमानने आश्रय घेतला. तेथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रहमानला अटक केली. रविवारी रहमानला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.विहीर मालकाला नोटीसएक्सप्रेस हायवेवरील ती विहीर ओम खेमचंदानी यांच्या शेतात आहे. तेथे देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याचे घटनास्थळी आढळून आलेल्या आक्षेपार्ह साहित्यांवरून पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे विहिरीला व शेताला सरंक्षण कुंपण लावण्यासंदर्भात खेमचंदानीला सूचना देण्यात आल्या आहेत.सीपींकडून स्पॉटची पाहणीपोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी रविवारी एक्सप्रेस हायवेवरील शीतलच्या हत्येच्या घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी गजभियेच्या चौकशीनंतर घटनेच्या दिवशी नेमके काय झाले असावे, यांचा अंदाज आयुक्तांनी घेतला.गजभियेची उलट तपासणीशनिवारी रात्री सुनिल गजभियेला पुन्हा सीपी दत्तात्रय मंडलिकांसमोर हजर केले असता त्याची उलट तपासणी करण्यात आली, मात्र, शीतलने आत्महत्याच केल्याच्या बयाणावर गजभिये ठाम असल्याचे दिसून आले.