शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

नांदगावपेठेत दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:44 IST

नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोमवारी दोन्ही गटांच्या आठ जणांना अटक केली. या घटनेच्या अनुषंगाने नांदगाव पेठ बंद ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देलग्न वऱ्हाडाला मारहाण : पोलीस बंदोबस्तानंतर तणावपूर्ण शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोमवारी दोन्ही गटांच्या आठ जणांना अटक केली. या घटनेच्या अनुषंगाने नांदगाव पेठ बंद ठेवण्यात आले होते.नांदगाव पेठ येथील रहिवासी प्रकाश भोपळे यांनी पोलिसांकडे रविवारी उशिरा रात्री तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, त्यांचे चुलतभाऊ आशिष रामदास भोपळे यांचे सोमवारी चांदूरबाजार येथे लग्न होते. यानिमित्त रविवारी सायंकाळी ७ वाजता वरात काढली. ती वाजत-गाजत बारीपुरा चौकातून रात्री ८.४५ वाजता बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळासमोरून जात असताना शारूख बशीरखाँ पठाण हा हाती भाला घेऊन आला. त्याचा भाल्याचा वार प्रकाश भोपळे यांनी अडविल्याने ते जखमी झाले. यादरम्यान वाद उफाळून आल्यावर शारूखसह सलमान बशीरखाँ पठाण, सादीक, सकीम व अन्य १० ते १२ जणांनी वरातीमधील नितीन राऊत, अनिकेत बाळस्कर, प्रज्वल भोपळे, कविता भोपळे, बेबी अंबाडकर, नंदा टारपे, शालिनी भोपळे, सविता भोपळे (रा.यावलपुरा) यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशिष्ट समुदायातील जमावाने वऱ्हाडींवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. या घटनेनंतर रात्री ९ वाजता संतप्त वऱ्हाडी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात धडकले आणि प्रचंड घोषणाबाजी करीत आरोपींवर कारवाईची मागणी केली. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.विशिष्ट समुदायातील जमावाने दिलेल्या तक्रारीनुसार, वरात बन्नेखा चौकातून जात असताना प्रार्थना सुरू होती. यामुळे वऱ्हाडी मंडळीला बँड वाजविण्यास मनाई केल्याने वाद उफाळून आला.दोन्ही गटांतील आठ जणांना अटकनांदगाव पेठेत या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधिकाºयांना योग्य निर्देश दिले. सोमवारी गावात तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे पोलिसांचा मोठा ताफा नांदगाव पेठेत तैनात आहे. पोलिसांनी वºहाडी मंडळीच्या तक्रारीवरून विशिष्ट समुदायातील नागरिकांवर गुन्हे नोंदविले असून, चार जणांना अटक केली. विशिष्ट समुदायातील नागरिकांच्या तक्रारीवरून चार वºहाडी व बँड पथकातील दोघांना अटक करण्यात आली. याशिवाय सरकारतर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे.नांदगावपेठेतील घटनेत परस्परविरोधी तक्रारीशिवाय सरकारतर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे. सद्यस्थितीत दोन्ही गटांतील चार जणांना अटक केली आहे. अशाप्रकारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल.- दत्तात्रय मंडलिकपोलीस आयुक्त.