शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीवरून राडा, नामांकनात गोंधळ

By admin | Updated: February 4, 2017 00:03 IST

ऐनवेळी तिकिट कापल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केलेली बेदम मारहाण, बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी ‘बी-फॉर्म’ वाटपाचा घेतलेला पावित्रा ...

‘आॅनलाईन’ची डोकेदुखी : ‘बी-फॉर्म’ वाटपावरून वादअमरावती : ऐनवेळी तिकिट कापल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केलेली बेदम मारहाण, बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी ‘बी-फॉर्म’ वाटपाचा घेतलेला पावित्रा आणि आॅनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ ही नामाकंन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीची वैशिष्ट्ये ठरली. २७ जानेवारीपासून महापालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामाकंन दाखल करण्याची मुदत होती. पक्षस्तरावर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींमध्ये बंडखोरीचे चित्र काहीसे स्पष्ट झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सावध पावित्रा घेतला. त्यामुळे शुक्रवारी शेवटच्या दिवशी ऐनवेळी उमेदवारांची अधिकृत यादी घोषित करण्यात आली आणि त्याचवेळी ‘बी फॉर्म’चे वाटप करण्यात आले. यायादीत नाव कुणाचे तर, बी-फॉर्म दुसऱ्यालाच असा प्रकार घडला. यामुळे असंतोष उफाळून काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते यांना मारहाण झाली. सायबर कॅफेवर चिकार गर्दीअमरावती : सर्वच पक्षीय उमेदवारांसाठी आॅनलाईन नामांकन भरणे अडचणीचे ठरले. त्यामुळे ‘बी-फॉर्म’ घेण्याच्या लगबगीसह दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली. पक्षाच्या अनेक अधिकृत उमेदवारांना दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षाचा अधिकृत ‘बी फॉर्म’ न मिळाल्याने अपक्ष म्हणूनच नामांकन दाखल करावे लागले. ४ फेब्रुवारीला होणाऱ्या छाननीमध्ये ‘बी-फॉर्म’वाटपात झालेल्या गोंधळाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुलाखती देऊनही वेळेवर ‘बी-फॉर्म’आणि पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी आपआपल्या पक्षांच्या नावे शिमगा केला. अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापल्याने बंडखोरी उफाळून आली. वेळेवर तिसऱ्याच पक्षाचा ‘बी फॉर्म’ घेऊन अनेक इच्छुकांनी पक्षांचे लेबल लावून घेतले. सायबर कॅफे चालकांनी तर उमेदवारांची अक्षरश: लूट केली. आॅनलाईन नामांकन भरुन देण्यासाठी काही कॅफेचालकांनी दोन ते पाच हजार रूपये उकळले. त्यामुळे उमेदवारांच्या संतापात आणि गोंधळात भर पडली. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘बी-फॉर्म’ आधीच वितरीत केले असते तर गोंधळ उडाला नसता, अशी सांघिक प्रतिक्रिया सर्वपक्षीय इच्छुक आणि बहुतांश उमेदवारांमधून उमटली. चारही प्रमुख पक्षांनी शुक्रवारी अगदी वेळेवर ‘बी-फॉर्म’चे वाटप केल्याने राजकीय गोंधळात भर पडली. शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना बी-फॉर्मचे वाटप होत असताना बंडखोरी उफाळून आली. शहराध्यक्ष अकर्ते यांच्या अंगावर धाऊन जात इच्छुक उमेदवाराने राडा केला. त्यांची कॉलर ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर अकर्ते यांच्या जवळ असलेले बी-फॉर्म पळवून नेण्यात आले. गडगडेश्वर प्रभागातील एका जागेची उमेदवारी अन्य एकाला जाहीर झाली असताना पळवून नेलेला बी-फॉर्म घेऊन एकाने तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती हाती आली आहे. एकंदरीतच शेवटच्या दिवशी आॅनलाईन नामांकनाने उमेदवारांची डोकेदुखी वाढवली. (प्रतिनिधी)सहाशेपेक्षा अधिक नामांकन दाखलअमरावती - झोन क्रमांक १ मधून ९८, झोन २ मधून १०९, झोन ३ मधून ८७, हमालपुरा झोनमधून ८३, राजापेठ मध्यझोनमधून ७९, भाजीबाजार झोनमधून ७८ तर बडनेरा झोनमधून ११३ नामांकन शुक्रवारी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी बुधवारपासून आॅनलाईन नामांकन दाखल करण्यास वेग आला होता. उशिरा सायंकाळपर्यंत महापालिका निवडणूक विभागाकडेही नामांकनाचीएकूण संख्या नव्हती. शनिवारी छाननीदरम्यान एकूण नामांकनाची संख्या निश्चित होईल.