शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अमरावती विद्यापीठात पेपरफुटीचे 'रॅकेट', खासगी कर्मचाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 20:43 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मॅकेनिक्स विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब २९ मे रोजी उघडकीस आली.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मॅकेनिक्स विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब २९ मे रोजी उघडकीस आली. त्यामुळे विद्यापीठात पेपर फुटीचे रॅकेट असल्याच्या शंकेला दुजोरा मिळाला आहे. हे प्रकरण थेट पोलिसांत न देता विद्यापीठाने आता चौकशीचा फार्स अवलंबला आहे. परीक्षा विभागातील स्पायरल बाईंड या कंपनीच्या अधिनस्थ आशिष राऊत, विनय रोहणकर हे दोघे खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. वाशीम येथील संमती अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका फुटल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर परीक्षा विभागाने संमती महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली असता, आशिष राऊत नामक युवकाकडून प्रश्नपत्रिका मागविल्याची कबुली त्याने दिली.विद्यापीठात खासगी कर्मचा-याकडून १० मिनिटांअगोदरच प्रश्नपत्रिका पाठविली जात होती. ती तातडीने डाऊनलोड करून आशिष राऊतच्या मोबाईलमध्ये व्हॉट्स अ‍ॅपवर यायची. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आले. संमती महाविद्यालयातील बोरे नामक कर्मचारी यात गुंतल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाइन वितरण पद्धतीने पाठविली जात असल्याने त्यावर संबंधित परीक्षा केंद्राचा क्रमांक वॉटर मार्कच्या स्वरूपात प्रश्नपत्रिकेवर प्रिंट होत होत्या. आशिष राऊत याच्याकडून पाठविली जाणा-या अनेक प्रश्नपत्रिकांवर तोच वॉटर मार्क आढळून आल्याने परीक्षा विभागाने संमती महाविद्यालयाची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाइन प्रिंट केल्यानंतर त्याची छायाचित्र आशिष हा एका घुसखोर तरुणाच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवित होता. त्यानंतर ती व्यक्ती प्रश्नपत्रिका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठी रक्कम घेऊन विकत असल्याची बाबदेखील यानिमित्ताने समोर आली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी केल्यास अनेकांचे हात ओले झाल्याची शंका नाकारता येत नाही. विद्यापीठाने खासगी कर्मचारी आशिष राऊत याचा मोबाईल जप्त केला असून, एफ.सी. रघुवंशी आणि ए.बी. मराठे या द्विसदस्यीय समितीकडे याबातच्या चौकशीची धुरा सोपविली आहे.सारणी विभागाने केला पर्दाफाशअभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका वेळेपूर्वीच ऑनलाइन जात असल्याचे विद्यापीठाच्या सारणी विभागाचे उपकुलसचिव दशमुखे यांनी पर्दाफाश केला. ही बाब दशमुखे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. आशिष राऊत आणि विनय रोहणकर हे पेपर सेटिंगमध्ये सहभागी असल्याची शंका विद्यापीठाने वर्तविली आहे. याप्रकरणी आता चौकशी सुरू झाली असली तरी यातील वास्तव कधी पुढे येतील, याकडे नजरा लागल्या आहेत.संमतीचा तो कर्मचारी निलंबितवाशीम येथील संमती महाविद्यालयातील कर्मचारी बोरे याला आशिष राऊत याने प्रश्नपत्रिका पाठविल्याप्रकरणी विद्यापीठाने राऊत याची चौकशी सुरू केली असून, महाविद्यालयीन व्यवस्थापनाने बोरे याला निलंबित केल्याची माहिती आहे.पेपरफुटीत अनेकांचा हात?अभियांत्रिकीच्या मॅकेनिक्स विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात अनेकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. परीक्षा विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य, परीक्षा केंद्राचे सह अधिकारीदेखील अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोनशे रुपये रोजंदारीवर श्रीमंतीचा थाटपरीक्षा विभागात दोन रुपये रोजंदारीवर कार्यरत आशिष राऊत, विनय रोहणकर या दोघे श्रीमंती थाटात वावरत असल्याने त्यांच्या बँक खात्याची चौकशी केल्यास बरीच सत्यता बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऑनलाइन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीत ऑनलाइन आर्थिक व्यवहारदेखील शोधणे हेदेखील विद्यापीठासमोर आव्हान आहे.याप्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. हे प्रकरण थेट पोलिसांत देण्याऐवजी विद्यापीठ स्तरावर योग्य शहानिशा करण्याच्या अनुषंगाने चौकशीचा निर्णय घेण्यात आला. चौकशी अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापीठ