शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

देशाच्या प्रगतीसाठी जातीय सलोखा राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:29 IST

देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले.

ठळक मुद्देमौलाना एजाज अहमद असलम : ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’

आॅनलाईन लोकमतअमरावती : देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले. येथील टाऊनहॉलमध्ये जमात-ए-इस्लामी हिन्दतर्फे आयोजित ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.मानसिक, आध्यात्मिक समाधान. सर्व जाती-धर्माच्या, सर्व वर्गांच्या तसेच सर्व स्तरातील घटकांमध्ये शांती, सुरक्षितता कायम करणे अर्थात् शांती. ती प्रस्थपित करण्यासाठी समाज व देशातील अस्वस्थता, अराजकता, अध:पतन संपुष्टात आणणे, देशवासीयांमध्ये बंधुत्व, मैत्री, प्रेम, एकमेकांप्रति सन्मान, सर्वांसाठी न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता वाढीस लावणे तसेच देशवासीयांच्या भौतिक, आध्यात्मिक आणि नैतिक प्रगतीसाठी समाजप्रबोधन करणे, वैचारिक व व्यावहारिक स्वैराचार, दुराचारातून मुक्ती तसेच जीवनात खºया अर्थाने यश संपादन करणे यासंबंधी मौलिक मार्गदर्शन नौशाद उस्मान यांनी केले.समता व न्यायावर आधारित व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सामाजिक परिवर्तनातून सकारात्मक क्रांतीसाठी झटणाºया उदारवादी जमात-ए-इस्लमी हिंद, महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यभर जनजागरण अभियान राबवीत आहे. ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ असे शीर्षक असलेल्या या अभियानांतर्गत राज्यभरातील ६०० ठिकाणांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.सदर सोहळ्याला अमरावती विभागातील मुस्लिम पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. मुस्लिमेत धर्मातील लोकांची दखलनीय उपस्थिती हे या आयोजनाचे वैश्ष्ठ्यि ठरले. व्यासपीठावर जमात-ए-इस्लामी हिंदचे अमरावती जिल्हाध्यक्ष अहमद मोहसीन शेख उपस्थित होते. काजी लईक अहमद यांनी सुरेख केले. शहर अध्यक्ष रफीक अहमद खान यांनी आभार व्यक्त केले.जनजागरण अभियानात विविध कार्यक्रमजमात-ए-इस्लामी हिन्दच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या जनजागरण अभियानात अनेक ठिकाणी जाहीर सभा, परिसंवाद, चर्चासत्र, कॉर्नर मीटिंग, पथनाट्य, शाळा व महाविद्यालयांमध्ये बौद्धिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, प्रदर्शन, सामूहिक भेटी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.