शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लस बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:50 IST

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात हैदास वाढला आहे. ही बेवारस कुत्री वाहनांच्या मागे लागतात. त्यामुळे वाहने सुसाट पळविण्यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वी या मोकाट कुत्र्यांनी शहरातील तीन इसमांना चावा घेतला. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देतीन नागरिकांना चावा : चांदूर बाजार तालुक्यात कुत्र्यांचा हैदोस

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात हैदास वाढला आहे. ही बेवारस कुत्री वाहनांच्या मागे लागतात. त्यामुळे वाहने सुसाट पळविण्यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वी या मोकाट कुत्र्यांनी शहरातील तीन इसमांना चावा घेतला. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.दरम्यान, रेबीज प्रतिबंधक लस जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे कुठेच उपलब्ध नसल्यामुळे सामान्य नागरिकांना औषधोपचारासाठी खाजगी आरोग्य यंत्रणेकडून महागडे उपचार करून घ्यावी लागत आहेत.सध्या कुत्र्यांच्या प्रजनन संक्रमणकाळ सुरू आहे . अशा अवस्थेत शहरात मोठ्या प्रमाणात असलेली मोकाट कुत्री आक्रमक अवस्थेत असतात. त्यांच्या या काळात रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक सहजरीत्या जात असले तरी ही मोकाट कुत्री नागरिकांवर समूहाने धावून पडतात. प्रसंगी चावाही घेतात या चाव्यामुळे दुखापत झालेल्या नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेण्याकरिता शासकीय रुग्णालयात किंवा शासकीय आरोग्य यंत्रणेकडे धाव घ्यावी लागते. या पावसाळी वातावरणातच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर ही लस आरोग्य विभागाकडे असणे अत्यावश्यक आहे. परंतु स्थानिक आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता, जिल्हाभरात कुठेच यंत्रणेकडे ही लस उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाची अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. ही लस अत्यंत महागडी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यासाठी शासनाने राष्ट्रीय आरोग्य विभागाकडे सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे.सध्या वरिष्ठ पातळीवरूनच या लसीची उपलब्धता आरोग्य विभागाकडे होत नाही.कुत्र्यांच्या चाव्यानंतर आवश्यक असलेली प्रतिबंधक लस ही उपलब्ध नसून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह कुठेच उपलब्ध नाही.- डॉ. संध्या साळकर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयकुत्रा चावल्यास रुग्णाला पाच रेबीज प्रतिबंधक लशी टोचून घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये ही लस महागडी असून, सर्वसामान्यांना न परवडणारी आहे.डॉ. हेमंत रावळेवैद्यकीय व्यावसायिक