शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ससा, कासव प्रकरणातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:25 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारु विक्री होत असल्याप्रकरणी कारवाई करावयास गेलेल्या पोलिसांना कासव, ससा हे वन्यपशू दिसून आले.

ठळक मुद्देवनविभाग फिरते पथकाची कारवाई : चार दिवसांची वनकोठडी

आॅनलाईन लोकमतअमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारु विक्री होत असल्याप्रकरणी कारवाई करावयास गेलेल्या पोलिसांना कासव, ससा हे वन्यपशू दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी हे प्रकरण वनविभागाकडे वर्ग केले. मात्र, यातील मुख्य आरोपीला वनविभागाच्या फिरत्या पथकाने जेरबंद केले असून, त्यास न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. राजकुमार वामनराव थोरात असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, परीविक्षाधीन आयपीएस पोलीस अधिकारी समीर शेख यांनी दहिगाव रेचा येथे अवैध दारूविक्री होत असल्याबाबत मंगळवार, ६ मार्च रोजी धाडसत्र राबविले. मात्र, या धाडसत्रादरम्यान पोलिसांना आरोपीच्या घरातून कासव, ससा हे वन्यपशूदेखील आढळलेत. ससा, कासव हे वनविभागाच्या नोंदी वर्ग १ चे पशू असल्याने त्यांना पाळीव ठेवता येत नाही. पोलिसांनी दारु विक्रीबाबत कारवाई करून हे प्रकरण वनविभागाकडे वळती केले. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाने दहिगाव रेचा येथे राजकुमार थोरात याचे घरातून ससा, कासव जप्त करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४३, ४४, ४९, ५० व ५१ अन्वये बुधवार, ७ मार्च रोजी वनगुन्हा नोंदविला आहे. आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी वनविभागाने न्यायालयास १२ मार्चपर्यंत वनकोठडी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची वनकोठडी देखील दिली होती. परंतु, आरोपीस वनकोठडीची मुदत संपताच सोमवारी न्यायालयात हजर केले असत,ा त्यास जामीन मिळाला.ससा, कासव हे पाळीवप्राणी नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट केले आहे. काही जण पैशासाठी घरी कासव पाळतात. परंतु कासव वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाळीव ठेवता येत नाही. अशाप्रकारची निरंतर कारवाई सुरूच राहील.- हेमंत मीना, उपवनसंरक्षक