शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र संघ निवडीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: September 29, 2016 00:17 IST

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा थाटात पार पडल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली.

पुण्यातील खेळाडूला डावलले : पालकांचा स्पष्ट आरोप अमरावती : राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा थाटात पार पडल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र, निवड समितीने पुणे संघातील एका खेळाडुूला मुद्दामच डावलल्याचा आरोप खेळाडूच्या पालकांनी केल्याने गोंधळ उडाला होता. पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना व जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान पाचदिवसीय बास्केटबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये राज्यभरातील ८०० खेळाडूंनी भाग घेतला. मंगळवारी स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.याकार्यक्रमात विजेता, उपविजेत्यांसह तृतीय क्रमाक पटकावणाऱ्या संघांना ट्रॉफी व बक्षिस वितरीत करण्यात आले. बुधवारी विविध वयोगटनिहाय खेळाडूंची चाचणी घेऊन महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार होता. निवड समितीने खेळाडूंची चाचणी घेऊन निवड केल्यानंतर पुणे संघातील एका खेळाडूच्या कोच व पालकांनी निवड समितीच्या पारदर्शकतेवरच आक्षेप घेतला. अन्य विजेता संघातील तीन खेळाडंूची निवड करण्यात आली. मात्र, पुणे संघातील केवळ दोन खेळाडूंची निवड केल्याने निवड समितीने सूर्यवंशी नामक खेळाडूला हेतुपुरस्सरपणे डावलल्याचा आरोप पालकांद्वारे करण्यात आला. प्रशिक्षकासह खेळाडूच्या आई-वडिलांनी उपसंचालक प्रतिभा देशमुख यांचे कक्ष गाठून न्यायाची मागणी केल्याने गोंधळ उडाला होता. आई-वडिलांच्या लेखी तक्रारीवरून पुढील कारवाईसंदर्भात दिशा ठरविण्यात येईल, अशा सूचना उपसंचालकांनी दिल्यात. त्यानुसार खेळाडूच्या वडिलांनी निवड समितीवर आक्षेप नोंदविणारी तक्रार दिली असून याप्रकरणाकडे लक्ष लागले आहे.