शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कर्मचाºयांकडून ‘प्रश्नचिन्ह’ची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:53 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील आदिवासी फासे पारधी समाज समितीच्या....

ठळक मुद्देसामाजिक दायित्व : आश्रमशाळेस लॅपटॉप, दोन संगणक, एक प्रोजेक्टर भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील आदिवासी फासे पारधी समाज समितीच्या ‘प्रश्नचिन्ह’ अनाथ व दुर्लक्षित बालकांच्या आश्रमशाळेस शैक्षणिक उपयोगी साहित्य प्रदान करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक जयंत वडते, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, सम कन्सेप्ट कंपनीचे बालकृष्ण, आयबॉलचे गिरीष पाटील, कर्मचारी संघटनेचे महासचिव विलास सातपुते, मागासवर्गिय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी, रवींद्र सरोदे, प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे सर्वेसर्वा मतीन भोसले आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक यांच्या योगदानातून दोन लक्ष ११ हजार सहयोग राशी देण्यात आले.डजिटल अभ्यासक्रम संच बहालपुणे येथील सम कन्सेप्ट टेक्नालॉजीतर्फे लॅपटॉप, कर्मचाºयांच्या सहकार्यातून दोन संगणक व एक प्रोजेक्टर तसेच आयबॉल कंपनी व कॉम्पकिन इलर्निंग सॉफ्टवेअरतर्फे इयत्ता १ ते १० पर्यत डिजिटल अभ्यासक्रमाचा संच कुलगुरुंच्या हस्ते 'प्रश्नचिन्ह' या आश्रमशाळेला हस्तांतरित करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन संजय ढाकुलकर तर आभार प्रदर्शन विलास सातपुते यांनी केले. यावेळी पद्मा चांदेकर, नीलेश वंदे, दिलीप पाटील, सतिश मानकर, प्रेम मंडपे, विठ्ठल मरापे, प्रफ्फुल ठाकरे, सतिश लोखंडे, राजू इंगोले, मुरलीधर चिरुलकर, संतोष मालधुरे आदी उपस्थित होते.दुर्लक्षित समाज घटकाच्या शिक्षणासाठी प्रयत्नकुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे दुर्लक्षित समाज घटकांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. दुर्लक्षित घटक हा विविध माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल, याचे नियोजन केले जात आहे. मतीन भोसले यांच्या कार्यांची प्रशंसा करताना त्यांनी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या सामाजिक कार्याच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल संघटनेचे कौतुक केले.