शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१२६ शाळांमध्ये गुणवत्ता चाचणी

By admin | Updated: January 7, 2015 22:46 IST

तालुक्यातील १२६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता, लेखन, वाचन व गणित विकास अभियान ५ व ६ जानेवारीला राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या

चांदूरबाजार : तालुक्यातील १२६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता, लेखन, वाचन व गणित विकास अभियान ५ व ६ जानेवारीला राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या १२१ व नगरपालिकेच्या ५ शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात आली. येत्या दोन दिवसांत या संबंधीचा संपूर्ण अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर होणार आहे. या अहवालानंतरच प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचे सत्य समोर येणार आहे.शासन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो. तरीही जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळांचा दर्जा अतिशय सुमार आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्राथमिकपणे गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, याची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेवून शासनाने वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम आखला होता. त्यानुसार ५ जानेवारी व ६ जानेवारीला शाळांमधून हे अभियान राबविण्यात आले आहे.वर्ग २ ते ५ च्या विद्यार्थ्यांकरिता हे गुणवत्ता तपासणी अभियान राबविण्यात आला. त्यासाठी किमान अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाची पुस्तिका आधीच सर्व शाळांना पाठविण्यात आली होती. त्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार गुणवत्ता तपासणी अभियान राबविल्या आले आहे. या पुस्तिकेत शिक्षकांना कशा पध्दतीने शिकवावे व विद्यार्थ्यांची चाचणी कशी घ्यावी या बाबतीचे सविस्तर विश्लेषन करण्यात आले आहे. याबाबतीचे प्रशिक्षणही शिक्षकांना आधीच देण्यात आले होते.वेगवेगळ्या वर्गासाठी चाचणीचे स्वरुप ही वेगवेगळे ठेवण्यात आले होते. वर्ग २ च्या विद्यार्थ्यांना सोपी दोन वाक्ये वाचता यावी. सोप्या चार वाक्यांचे वाचन करुन त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहीण्यास सांगण्यात आली. ओळखीचे चित्र पाहून त्याचे नाव लिहिण्या लावणे, अंक २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन, लेखन, तुलना आणि एक अंकी संख्यांची बेरीज-वजाबाकी देण्यात आली होती. वर्ग तीन मधील विद्यार्थ्यांना चार ते पाच ओळींचा परिच्छेद वाचावयास देण्यात आला. त्यावर आधारित प्रश्नही विचारण्यात आलेत. तसेच चार वाक्यांचे लेखन, दोन अंकी संख्याचे वाचन, लेखन व तुलना यावरुन गुणवत्ता तपासणी करण्यात आली. चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा ते आठ ओळींचा परिच्छेद वाचन, सोप्या वाक्याचा मजकुरावरुन त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहीने, चित्राच्या आधारावर दोन ते तीन वाक्य लिहीने, १००० पर्यंतच्या संख्यांचे वाचन व तीन अंकी संख्यांची तुलना व मांडणी यावरुन गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तसेच वग ५ साठी आठ ओळींचे परिच्छेद वाचन, सोप्या वाक्यांचा मजकुरावर त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहने ठरविण्यात आली आहे. ईरशाद खान, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स. चांदूरबाजार, शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात आले असून लवकरच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर अहवाल प्राप्त होणार आहे. यात गुण व वक्तेनुसार अ,ब,क, ड अशी चार गटात विभागणी करण्यात येईल. यामध्ये ७५ च्या वरील ब मध्ये ५० ते ७५, क मध्ये ३५ ते ५० व ड मध्ये १५ टक्के च्या खालील विद्यार्थी राहतील. यात क व ड गटातील विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शक पुस्तिकेनुसार त्यांच्या गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या जाणार आहे.