शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूटचे ‘ड्रायोमिक्स’ ठरले सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:01 IST

स्थानिक प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चच्या विद्यार्थ्यांनी बांधकाम व इमारत दुरुस्तीच्या कामात उपयोगी ठरणारे ड्रायोमिक्स या उत्पादनाची निर्मिती केली आहे. ‘टेक-टॉप २०१८’ या राष्ट्रीय स्पर्धेत या उत्पादनाने तिसरा क्रमांक पटकावला, तर एआयसीटीईने २४ नावीन्यपूर्ण संकल्पनांमध्ये त्याची निवड केली आहे.

ठळक मुद्देएआयसीटीईकडून प्रशंसा : कंपन्यांकडून उत्पादनासाठी प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : स्थानिक प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चच्या विद्यार्थ्यांनी बांधकाम व इमारत दुरुस्तीच्या कामात उपयोगी ठरणारे ड्रायोमिक्स या उत्पादनाची निर्मिती केली आहे. ‘टेक-टॉप २०१८’ या राष्ट्रीय स्पर्धेत या उत्पादनाने तिसरा क्रमांक पटकावला, तर एआयसीटीईने २४ नावीन्यपूर्ण संकल्पनांमध्ये त्याची निवड केली आहे.स्थापत्य अभियांत्रिकीची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी जास्मिन मोरय्या हिच्यासह पासआऊट झालेले प्रणव डालकर, अक्षय वाघ, चेतन वानखडे आणि अंकुर इंगळे यांनी बांधकाम आणि दुरुस्ती-देखभालकरिता अत्यंत उपयोगी असणारे ड्रायोमिक्स या उत्पादनाची निर्मिती केली. तामिळनाडूतील राष्ट्रीय संशोधन केंद्र कलासालिंगम येथे आयोजित ‘टेक-टॉप २०१८’मध्ये या चमुने ड्रायोमिक्ससाठी तृतीय क्रमांक आणि ३० हजारांचे पारितोषिक पटकावले. त्यामुळे राष्ट्रीय संशोधन कार्यशाळा-२०१८ साठी त्याची निवड झाली आहे. अनेक मान्यवर संशोधक व बांधकाम क्षेत्रातील दिग्गजांनी ड्रायोमिक्सचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांकडून ड्रायोमिक्सचे भरपूर उत्पादन घेण्यासाठी आॅफर मिळाल्या तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, कार्यकारिणी पदाधिकारी हेमंत देशमुख, पंकज देशमुख, युवराजसिंह चौधरी, उदय देशमुख, नितीन हिवसे, गजानन काळे आणि रागिनी देशमुख, प्राचार्य ए.पी. बोडखे, उद्योजकता विकास विभागाचे अधिष्ठाता एन.डब्ल्यू. काळे व उद्योजकता विकास विभागाचे प्रभारी ए.यू. आवटे यांनी कौतुक केले.पेटेंटची प्रक्रियाप्रा. एम.व्ही. मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज केला. पेटेंटसाठी त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. हे पेटेंट मंजूर होईल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. ड्रायमिक्समध्ये ड्राय कॉंक्रीट, टाइल-ओ-फिक्स, ड्राय-ओ-मिक्स-अ‍ॅडमिक्स्चर आदी बाबींचा अंतर्भाव असून, त्यासंबंधी उत्पादनांची निर्मिती करू, असे ते म्हणाले.