१६४६ कामांना मान्यता : ८४१ शासकीय कामे रखडलीअमरावती : दुष्काळावर मात करुन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवावा व याद्वारे शेतकरी आत्महत्याचे दृष्टचक्र नष्ट व्हावे, या उद्देशाने शासनाचे महत्त्वाकांक्षी उपक्रम जलयुक्त शिवारमध्ये इतर विभागाच्या तुलनेत झुकतेमाप दिले जाते. मात्र नियोजनाअभावी यंदा जलशिवारची वाट लागली आहे. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फक्त ८०५ कामेच पूर्ण झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे.जलयुक्त शिवार अभियानासाठी सन २०१६-१७ करिता जिल्ह्यात १२ प्रकारच्या यंत्रणाद्वारा ३७२५ अंदाजपत्रके तयार करण्यात आली. यामध्ये एकट्या कृषी विभागाचे २११५ अंदाजपत्रके होते. यापैकी १६४६ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ७५ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये ७६१ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी ५७ कामे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होती, तर ८०५ कामे पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच ८४१ कामे अद्यापही रखडली असल्याचा धक्कादायक अहवाल आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय मान्यता असलेल्या कामांना ११ कोटी ३५ लाख ४५ हजारांची प्रशासकीय मान्यताप्राप्त आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात प्रशासकीय मान्यतेच्या ४३ कामांवर १५.०७ लाख, भातकुली ३७३ कामे २४२.४१ लाख, तिवसा २०२ कामे १६६.७६ लाख, चांदूररेल्वे ६३ कामे २९.९९ लाख, नांदगाव १७.०९ लाख, धामणगाव १०० कामे ६३.१७ लाख, मोर्शी १३४ कामे १६३.७८ लाख, वरूड ६२ कामे २९.३२ लाख, दर्यापूर ३१५ कामे ११४.८३ लाख, अंजनगाव १७८ कामे ७५.६९ लाख, अचलपूर २१० कामे ११०.२७ लाख, चांदूरबाजार ९१ कामे ३९.२० लाख, धारणी ४३ कामे २२.८१ लाख व चिखलदरा तालुक्यात ५३ कामांना ४५.०६ लाखाची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. चार दिवसावर मार्च एंडींग आला असल्याने करोडोंचा निधी अखर्चिक राहण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवारला ‘कृषी’चा ‘दे धक्का’
By admin | Updated: March 29, 2017 00:19 IST