शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळूला पायबंद घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:11 IST

यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून अवैध व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यवतमाळ व अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप आग्रही : विभागीय आयुक्तांनी दिले कारवाईचे निर्देश

आॅनलाईन लोकमतअमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून अवैध व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यवतमाळ व अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात या विषयात बैठक झाली.जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून सर्रास सूर्योदय ते सूर्यास्त वगळून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणार अवैध व ओव्हरलोड वाळूची वाहतूक होत आहे. ही सर्व वाहतूक धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या तालुक्यांतून होत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्तेही खराब होण्याची प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आ. जगताप यांनी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार अवैध व ओव्हेरलोड वाळू वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे अमरावती व यवतमाळ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी, तहसीलदार यांची संयुक्त बैठक १६ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीत सध्या जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून सूर्योदय ते सूर्यास्त ही वेळ सोडून रात्रीच्या दरम्यान अवैध व ठरवून दिलेल्या भारमानापेक्षा अधिक वाळूची वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्त्याचीही बिकट अवस्था झाली आहे. लिलावातून विक्री करण्यात आलेल्या वाळूघाटात रात्रीदरम्यान जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करताना ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक उपसा केला जात आहे. याशिवाय एकाच रॉयल्टीवर तीन ते चार वेळा वाळूची, तेही क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर होणारी अवैध व ओव्हरलोड वाहतूक पूर्णत: बंद करण्याची मागणी आ. जगताप यांनी बैठकीत केली. त्यानुसार वरील प्रकारे नियमबाह्य व अवैध प्रकारे वाळू वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्त पीयूष सिंह सिंह यांनी जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी महसूल विभागाला दिले आहेत. बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे, तहसीलदार नांदगाव मनोज लोणारकर, चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजगडकर, धामणगाव तहसीलदार डोईफोडे आदी उपस्थित होते.पाच ठिकाणी चेकपोस्ट, संयुक्त पाहणी होणारयवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटाची अमरावती व यवतमाळ येथील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार संयुक्त पाहणी करणार आहेत. यानंतर यासंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर केला जाणार आहे. याशिवाय पाच ठिकाणी चेकपोस्ट लावले जाणार आहेत. यात महसूल व पोलीस अधिकारी-कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे. धामणगाव रेल्वे ३, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी प्रत्येकी १ चेकपोस्ट लावले जाणार आहेत. यासोबतच भरारी पथकात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय बैठकीत झाला.