शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

वाळू माफियांनी खोदून काढले पूर्णा नदीचे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST

फोटो पी १९ परतवाडा फोल्डर खोदकामाचा नियम धाब्यावर: कारवाई कुणावर? नरेंद्र जावरे - परतवाडा : भातकुली तालुक्यातील पोहरा येथील ...

फोटो पी १९ परतवाडा फोल्डर

खोदकामाचा नियम धाब्यावर: कारवाई कुणावर?

नरेंद्र जावरे - परतवाडा : भातकुली तालुक्यातील पोहरा येथील लिलाव झालेल्या वाळूघाटातील रेतीची उचल न करता इतर ठिकाणांहून रेती चोरून नेली जात असल्याचा प्रकार उघड होताच, महसूल विभागाची झोप उडाली आहे. दुसरीकडे नियम धाब्यावर बसवून घाटमालकांसह चोरांनी पूर्णा नदीच्या पात्रात तीन फुटांपेक्षा अधिक खोदकाम केल्याचे गंभीर चित्र आहे. त्याद्वारे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दोन वर्षांपासून जिल्ह्यात रेतीबाबत सर्वत्र ओरड आहे. भातकुली, धामणगाव रेल्वे ते दर्यापूर, तिवसा येथील एकूण नऊ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामध्ये पोहरा पूर्णा येथील रेतीघाटाचा लिलाव १ कोटी १२ लक्ष रुपयांपेक्षा अधिक दराने झाला. त्या मोबदल्यात ३९७५ ब्रास रेती उचलण्याची परवानगी घाटमालकाला देण्यात आली. त्यासाठी नियम व अटी लागू करण्यात आल्या. प्रत्यक्षात सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून वाटेल तेथून बेछूट नदीपात्राची चाळण केली जात असल्याचे गंभीर चित्र आहे. परंतु, महसूल विभाग पाहिजे त्या प्रमाणात गंभीर नसल्याचे वास्तव आहे. दोन ब्रासऐवजी ट्रकमध्ये तीन ब्रासपेक्षा अधिक रेती नेली जात आहे.

बॉक्स

पूर्णा नदीपात्रात नियमाची ऐसीतैसी

भातकुली तालुक्यातील पोहरा येथील परवानगी असताना, रेती तस्करांनी अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातून रेतीचोरीचा सपाटा लावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. जिल्हा प्रशासनाला एका तक्रारीनंतर जाग आली. महसूल प्रशासन पहाटे ५ पासून घटनास्थळी गेल्यावर वाळूने भरलेले पाच ट्रक पकडण्यात आले. घटनास्थळी दहा ते वीस फुटांपेक्षा अधिक खोल खड्डे रेतीचोरांनी केल्याचे चित्र आहे. नियमावली धाब्यावर बसविण्यात आली आहे.

बॉक्स

पाच ट्रकमालकांना कारणे दाखवा

अचलपूर महसूल विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी येलकी पूर्णा परिसरात पूर्णा नदीपात्रातून पाच ट्रकवर कारवाई केली. या सर्व ट्रकमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारचा वेळ देण्यात आला होता. परंतु, त्यांनी म्हणणे मांडले नाही. त्यामुळे पुन्हा सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. प्रत्यक्ष त्यांना अजूनपर्यंत दंड ठोठावण्यात आला नाही.

कोट

पोहरा पूर्णा येथील पूर्णा नदीच्या पात्रात अर्धा मीटरपासून खोदकामाची परवानगी देण्यात आली आहे.

सुनील रामटेके, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अमरावती

कोट २

येलकी पूर्णा नदीपात्रातून रेती चोरून नेणाऱ्या पाच ट्रकमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दंड किंवा इतर कारवाई करण्यात येईल.

- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर

पान २ ची लिड