शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी तूर खरेदी बंद

By admin | Updated: February 21, 2017 00:14 IST

राज्य शासनाच्यावतीने नाफेडद्वारे तुरीची खरेदी सुरू झाली. परंतु माल साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून चार दिवसांपासून तूर खरेदी बंद केली आहे.

साठवणुकीचा प्रश्न : शेकडो शेतकऱ्यांची तूर पडून प्रभाकर भगोले चांदूररेल्वेराज्य शासनाच्यावतीने नाफेडद्वारे तुरीची खरेदी सुरू झाली. परंतु माल साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून चार दिवसांपासून तूर खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी तुरीचे पोते घेऊन बाजार समितीत जमल्याचे चित्र आहे. नाफेडचे खरेदी केंद्र बंद असल्याची सूचना सोमवारी फलकावर लावली नव्हती, हे विशेष. सोमवारी नाफेडचे गुणपरीक्षण अधिकारी कुणाल चारथड व नाफेडचे एजंट काळे हे बाजार समितीत बसलेले दिसून आले. नाफेडची तूर खरेदी सुरू असताना काही व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या नावे तूर विक्री करून हात ओले केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. नाफेडने शेतकऱ्यांची जवळपास ११०० क्विंटल तूर खरेदी केली. वखार मंडळाचे भांडार तुरीने हाऊसफुल्ल झाल्याने तूर साठवणूक करता येणार नाही, असा लेखी पत्रव्यवहार बाजार समितीसोबत करण्यात आला. त्यामुळे १७ व १८ फेब्रुवारीला दोन दिवस तूर खरेदी बंद होती. सोमवारी शेतकऱ्यांनी तुरीचे पीक बाजारात विक्रीसाठी आणले होते. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. बाजार समितीने तो माल रिकामा करून घेतला. परंतु नाफेडच्या अधिकाऱ्याने साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची तूर घेण्यास सपशेल नकार दिला. बाजार समितीत व्यापाऱ्यांचे तुरीचे दर ३,९०० ते ४,२०० रूपये प्रतिक्विंटल असल्याने गरजू शेतकऱ्यांना नाईलाजास्तव त्यांच्या पिकाची विक्री करावी लागत आहे. बाजारात तुरीचे दर कमी असल्याने सेतकी वर्ग मोठ्या प्रमाणात नाफेडद्वारे तूर विक्री करण्यास इच्छुक आहे. परंतु या सर्व प्रकारावर सहकार खाते, पणन् खाते नियंत्रण ठेवण्यास कुचकामी ठरल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. २० फेब्रुवारी रोजी १२०० क्विंटल तुरीची आवक चांदूररेल्वे बाजार समितीमध्ये झाली आहे. परंतु नाफेडने खरेदी बंद केल्यामुळे हा शेतमाल बाजार समितीच्या आवारात साठवून ठेवण्यात आला आहे. सध्या चांदूररेल्वे बाजार समिती यार्डवर तीन दिवसांपासून तुरीची भरपूर आवक आहे. गोदाम नसल्याने तहसीलदारांची भेट घेऊन शासकीय धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली असून गोदाम पाहणे सुरू आहे. - चेतन इंगळे, सचिव बाजार समिती, चांदूररेल्वे बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे खरेदी केलेल्या तुरीमुळे गोदाम पूर्णत: भरले आहे. आता पुढचा साठा करता येणार नाही. तशी सूचना देण्यात आली होती. चांदूररेल्वेत स्वतंत्र गोदाम हवे, गोदाम उपलब्ध झाल्यावर तूर खरेदी करता येईल. - कुणाल चारथड,ग्रेडर, नाफेड