शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

चायनिज मांजाची जीवाला ‘सजा’, केव्हा थांबणार ‘कटाप’ची मजा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

पान १ अमरावती : दोन दिवसांपूर्वी एका नवतरुणीचा चायनिज मांजाने बळी घेतला, तर सव्वा वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड ...

पान १

अमरावती : दोन दिवसांपूर्वी एका नवतरुणीचा चायनिज मांजाने बळी घेतला, तर सव्वा वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथील सात वर्षीय चिमुकल्याला याच मांजाने प्राण गमवावा लागला. चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. वसाडची घटना जशी विस्मृतीत गेली, तशी दिव्याचीही जाणार, हे नक्की. मग प्रश्न उरतो, चायनिज मांजाची जिवाला ‘सजा’ होत असताना, त्याला पतंग लावून उडविणाऱ्यांची ‘कटाप’ची मजा केव्हा थांबणार?

दिव्या शंकर गवई या तरुणीच्या मृत्यूनंतर शहर पोलिसांनी चार ठिकाणी धाडी घालून ५१ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. यापुढेही कारवाई होईल. मात्र, असे प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. नायलॉन मांजाने अनेक पशूपक्षांचे जीव गेले, मानवही त्याचे बळी ठरले. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणारच नाही, असा वसा घेण्याची व तो न टाकण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा त्या मांजाला माहीत नाही की तो कुणाचा गळा चिरतोय? पतंग उडविणाऱ्याच्या आप्तांचा की एखाद्या आगंतुकाचा?

शहर पोलिसांच्या चार ठिकाणी धाडी

गुन्हे शाखा व पोलीस आयुक्तांच्या पथकातील पोलिसांनी राहुलनगरातील एका दुकानात धाड टाकून ६६० रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी दुकानदार रहमान खान सुभान खान (५४, रा. साबनपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई २१ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास करण्यात आली. उस्माननगर येथून शेख रफीक शेख लाला (४७, रा. नालसाबपुरा) याला ताब्यात घेऊन नायलॉन मांजासह अन्य साहित्य असा एकूण ४० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मसानगंज परिसरातील रहिवासी दीप राकेश साहू (१८) याच्या ताब्यातून ६ हजार ४०० रुपयांचा चायना मांजा जप्त केला आहे.

बडनेऱ्यातही गुन्हा दाखल

बडनेरा : चायना मांजाची विक्री करणाऱ्या राजेश पुंडलिक टरपे (३९, रा. जुनीवस्ती बडनेरा) या दुकानदाराविरुद्ध बडनेरा पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून पर्यावरण सुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. भगतसिंग चौकात २२ जून रोजी ही कारवाई पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात एपीआय शुभांगी गुल्हाने, जमादार घनश्याम यादव यांनी केली. मांजाचे एकूण १० नग व चक्री जप्त केल्या. याची किंमत ३६०० रुपये असल्याचे नमूद आहे.

दिव्या मृत्यूप्रकरणात ३०४ दाखल

दिव्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २२ जून रोजी तिचे वडील शंकर गवई यांनी तक्रार नोंदविली होती. २१ जून रोजी समर्पण काॅलनी येथून दुचाकीने जात असताना नायलाॅन मांजा गळ्यात अडकून तिचा गळा चिरला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास गाडगेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगोले हे करीत आहेत.