शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या विलास डोईफोडेने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:44 IST

डाव प्रतिदावाच्या चुरशीत पुण्याचा मल्ल विलास डोईफोडे याने हरियाणाच्या मल्लाला पराभूत करून बडनेऱ्यातील युवा स्वाभिमान पक्ष व तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या .....

ठळक मुद्देराज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : महाराष्टÑ केसरी अभिजीत कटके उपस्थित

आॅनलाईन लोकमतबडनेरा : डाव प्रतिदावाच्या चुरशीत पुण्याचा मल्ल विलास डोईफोडे याने हरियाणाच्या मल्लाला पराभूत करून बडनेऱ्यातील युवा स्वाभिमान पक्ष व तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय मिळविला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके विशेष करून उपस्थित होते.जुन्यावस्तीतील सावता मैदानावर १२ व १३ जानेवारी रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्रासह इतरही राज्यातील मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. मुख्य लढतीच्या दिवशी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याने संपूर्ण मैदानाला फेरफटका मारून प्रेक्षकांना अभिवादन केले. कुस्ती स्पर्धेचे आयोजक आ. रवी राणा, नवनीत राणा, संजय तिरथकर यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके याचा चांदीची गदा व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. मुख्य लढत पुण्याचा विलास डोईफोडे व हरियाणाचा सोनुकुमार यांच्यात झाली. या दोघांमध्ये अर्धा तास कुस्ती चालली. यात पुण्याचा विलास डोईफोडे हा विजय ठरला. तुल्यबळ लढतीत एका डावात सोनुकुमार याला पुण्याच्या मल्लाने चित्त केल्याचा आग्रह धरल्याने काही वेळ ही कुस्ती थांबून होती. नंतर चित्रफीत तपासून पुन्हा पाच मिनिटांचा अवधी देत ज्याने पहिला पॉर्इंट जिंकला त्याला पंचकमेटीने विजयी ठरविले. यात विलास डोईफोडेला विजयी घोषित करण्यात आले. त्याला रोख रक्कम व गदा देण्यात आली. मुख्य लढतीच्या कार्यक्रमाला शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, क्रीडा अधिकारी, गणेश जाधव, अविनाश पुंड, पोलीस उपायुक्त शशिकुमार सातव, चिन्मय पंडित, शंकरराव हिंगासपुरे आदी उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून सुबोध भागडकर व मनोज तायडे यांनी काम पाहिले. संचालन नाना आमले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीळकंठ कात्रे, सचिन भेंडे, विनोद जायलवाल, अजय बोबडे, अजय जयस्वाल, संजय हिंगासपुरे, राजू रोडगे, विनोद गुहे, अमोल मिलखे, विलास वाडेकर, रामू कातोरे, निल निखार, अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे, जयंतराव वानखडे, सुधीर लवणकर, अजय मोरय्या, ज्योती सैरिसे, चंदा लांडे, यासह इतरही कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.