शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे तत्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

भिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडली आहे. यावरील १३० हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे १५  शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती वैभव फरतारे यांनी ना. ठाकूर यांना दिली. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. तिवसा तालुक्यातील शिवणगावकडे येणाऱ्या सूर्यगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केली. तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, गटविकास अधिकारी चेतन जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तिवसा मंडळ कृषी अधिकारी अरुण गजभिये, मार्डी मंडळ कृषी अधिकारी विलास केचे आदी उपस्थित होते. शिवणगाव येथील पावसाने पडझड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी यावेळी केली. तेथील २१८ पंचनामे झाले असून, ९०४  हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे वैभव फरतारे यांनी सांगितले. सूर्यगंगा  नदीवरील पुलामुळे अतिवृष्टीत अनेकदा गावाशी संपर्क तुटतो. या पुलाची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहीद गणेश नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नुकसानग्रस्त एकही व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अचूक पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना न्याय प्रदान करावा, अशा सूचना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिल्या.

भिवापूरच्या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावेभिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडली आहे. यावरील १३० हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे १५  शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती वैभव फरतारे यांनी ना. ठाकूर यांना दिली. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले. तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे मुसळधार पावसामुळे धरणातील  अतिरिक्त पाणी भिवापूरकडे जाणाऱ्या पुलावरून वाहते. त्यामुळे खचलेल्या  या पुलाची  उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, असे कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य यांना सांगितले.पावसामुळे रस्ते व वाहतूक बंद होऊ नये, तसेच गावाचा  संपर्क तुटू नये, यासाठी कुऱ्हा ते बोर्डा मार्गाचे खोलीकरण योग्य पद्धतीने करावे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी या मार्गावरील तीन विद्युत खांबावरील रोहित्राची उंची वाढविण्याचे निर्देश महावितरणचे राजेश पाटील यांना देण्यात आले. मौजा चेनुष्टा व बोर्डा येथे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे झाले. त्याची पाहणी ना. ठाकूर यांनी केली. येथील नुकसानीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर झालेल्या नुकसानीबाबत तपशीलवार नोंदणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरfloodपूर