शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक स्वच्छतागृह, छे! ठेकेदारांचे गोडाऊनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:44 IST

महापालिकेतील १६०० पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबविण्यासाठी उभारलेले स्वच्छतागृह कुलूपबंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहापालिका आवारातील प्रकार : बांधकाम सामग्री ‘कुलूपबंद’, आयुक्त कारवाई करतील का ?

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेतील १६०० पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबविण्यासाठी उभारलेले स्वच्छतागृह कुलूपबंद करण्यात आले आहे. ते सार्वजनिक वापरासाठी खुले न करता तेथे संबंधित ठेकेदाराने बांधकाम सामग्री ठेवली आहे. त्यामुळे ते स्वच्छतागृह नव्हे तर ‘जुझर सैफी’चे गोडावून झाल्याचे वास्तव समोर आले आहे.महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील अन्य स्वच्छतागृहांची दुरवस्था लक्षात घेता आधुनिक स्वच्छतागृह उभारणीचा संकल्प सोडण्यात आला. १७ लाखांपेक्षा अधिकचा खर्च करून अत्याधुनिक सामग्रीचा वापर करीत दुमजली स्वच्छतागृह उभारण्यात आले. त्यासाठी महापालिका आवारातील पाकिंगसाठी वापरण्यात येणारी जागा कंत्राटदार जुझर सैफीला दिली. फेब्रुवारीत बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, शौचालय खुले न करता जुझर सैफी या कंत्राटदाराने त्यात अन्य कामासाठी वापरण्यात येणारे बांधकाम व लोखंडी साहित्य त्यात जमा करून ठेवली आहे. ते लाखो रूपयांचे साहित्य चोरीला जाऊ नये, यासाठी त्या शौचालयाला सायंकाळी कुलूप ठोकण्यात येते. सैफी यांनी या स्वच्छतागृहाला गोडाऊनचे रूप दिले आहे. या विस्तीर्ण अशा स्वच्छतागृह कम गोडावूनमध्ये लोखंडी सलाखा, सिमेंटची पोते, रॉड व इतर साहित्य ठेवले आहे. बांधकाम पूर्ण करूनही अनिवार्य बाब असलेले स्वच्छतागृह सुस्थितीत महापालिकेला हॅन्डओव्हर न करता त्याला गोडावूनचे स्वरूप मिळत असेल तर त्यावर बांधकाम विभागाचा असलेला वरदहस्त अधोरेखित होतो. सैफी महापालिका प्रशासनाला भाव देत नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.प्रशासनाचे धाडस का होत नाही?मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोलवर जाहिराती झळकविल्या असताना त्यांना नोटीस पाठविण्याचे धारिष्ट्य प्रशासन करू शकले नाही. जुझर सैफी यांनीही महापालिकेच्या स्वच्छतागृहाचा खासगी वापर चालविला असताना त्यांना विचारणा करण्याची हिंमत बांधकाम विभाग करू शकला नाही. मालू इन्फ्रास्पेस प्रमाणेच जुझर सैफी यांच्यावर असलेले प्रशासनाचे प्रेम यानिमित्ताने जगजाहीर झाले आहे. तथापि, कारवाई करण्यास प्रशासन का धजावत नाही, हे मात्र अनुत्तरित आहे.