शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसीबी गणेशोत्सवात लाचखोरीविरुद्ध करणार जनजागृती

By admin | Updated: August 31, 2014 00:09 IST

अमरावती विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गणेशोत्सवात लाचखोरीविरुद्ध जनजागृती करणार.

नितीन गव्हाळे/अकोला शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील लाचखोरी रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)तर्फे अनेक प्रयोग राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या गणेशोत्सवामध्ये या विभागाच्या वतीने अमरावती विभागातील सर्व जिल्हय़ांमध्ये लाचखोरीविरूद्ध मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनमानसात प्रचंड आक्रोश असूनही, लाच घेणारे व देणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर, सध्या एसीबीने लाचखोरांविरूद्ध धडाक्यात मोहीम सुरू केली आहे. दररोज कुठे ना कुठे लाचखोर जाळय़ात अडकत आहेत. त्यामुळे आता एसीबीच्या अधिकार्‍यांनी कारवाईसोबतच विविध स्तरावर समाजात जनजागृती करण्याची मोहीम आखली असून, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये लाचखोरी, भ्रष्टाचार या विषयावर पथनाट्याच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावतीचे पोलिस उपअधीक्षक सचिन शिंदे यांच्या देखरेखीखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी मूर्तिजापूरच्या नाट्यपथकाची निवड करण्यात आली आहे. या नाट्यपथकाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृती करण्यात येणार आहे. सोबतच ऑटोरिक्षांवरील पोस्टर्स, स्टिकर्स आणि पत्रकांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाईल. गणेशोत्सव हा जनतेचा उत्सव आहे. यानिमित्ताने हजारो तरूण, तरूणी एकत्र येतात. त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये ह्यभष्ट्राचार थांबवा, देश वाचवाह्ण मिशनतर्गंत एसीबीच्या वतीने अकोला जिल्हय़ात नाट्यपथकाव्दारे जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक सचिन शिंदे यांच्या देखरेखीखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून ही जनजागृती होणार असल्याचे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी सांगीतले. *स्टॉप करप्शन, सेव्ह नेशनएसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृतीसाठी ह्यहाय टेकह्ण पद्धतीचा अवलंब केला आहे. फेसबुक, व्हॉट्स अँप यासारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांचा उपयोग करीत, भष्ट्राचाराविरूद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. लाच घेणार्‍या शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचार्‍यांची छायाचित्रे फेसबुकवर टाकण्यात येत आहेत. ह्यस्टॉप करप्शन, सेव्ह नेशनह्ण या मिशनतर्गंत अमरावती विभाग एसीबीने सुद्धा जनजागृतीसाठी मोहिम हाती घेतली आहे.