शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआय निलंबित

By admin | Updated: June 23, 2014 23:36 IST

‘दहशत चोरीची’ या वृत्त मालिकेची दखल पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी अखेर घेतलीच. साध्या वेशात त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा अचानक आढावा घेतला. कर्तव्याला दुय्यम

कारवाईचा धडाका आता सुरु : ठाणेदारांच्या ‘त्या’ बदल्या कारवाईच !अमरावती : ‘दहशत चोरीची’ या वृत्त मालिकेची दखल पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी अखेर घेतलीच. साध्या वेशात त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा अचानक आढावा घेतला. कर्तव्याला दुय्यम स्थान देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला त्यांनी जागीच निलंबित केले. या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, सामूहिक बलात्कारांसारख्या वाढत्या गुन्ह्यांमुळे अमरावतीकर भयभीत झाले. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. यानंतरही पोलीस अधिकारी ‘आग लगे बस्ती में...’ या तोऱ्यातच वावरत राहिले. याबाबत अनभिज्ञ असलेल्या पोलीस आयुक्तांनी केबीनमधून बाहेर पडावे आणि कायद्याचे रूप बघावे, या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी घेतली. अचानक काही पोलीस ठाण्यांना त्यांनी भेटी दिल्यात. आयुक्तांची खासगी वाहनाने गस्तशहराचा फेरफटका मारला. कर्तव्य बजावण्याऐवजी विश्राम घेणाऱ्या राजापेठच्या पोलीस उपनिरीक्षावर निलंबनाची कारवाई केली. तसेच शनिवारी रात्री उशिरा तीन ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्याही केल्या. या बदल्या प्रशासकीय बाब नसून कारवाईच असल्याचे मेकला यांनी स्पष्ट केले.पोलीस सूत्रानुसार, रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवीनगर, बडनेरा मार्गावरील बेनाम चौक व शंकरनगर-दस्तुरनगर मार्गावरील हरीगंगा आॅईल मील परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी उपनिरीक्षक, ट्रॅफिक पोलीस व तीन शिपाई असा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. हे पथक मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन गरज भासल्यास कारवाई करीत होते. साईनगरातील बेनाम चौकात नाकाबंदीसाठी राजापेठचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. मानकर, ट्रॅफिक पोलीस संजय अडसड, शिपाई ठाकूर, खुशाल तायडे व कुकडे यांना कर्तव्यावर नियुक्त केले होते. याचदरम्यान दुपारी १ वाजता पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला हे आपल्या खासगी वाहनाने शहराचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेत. ते बडनेरा मार्गाने जात असताना नाकाबंदीसाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक मानकर हे सोबतच्या कर्मचाऱ्यांसह वाहनांची तपासणी करण्याऐवजी एका झाडाखाली आराम करताना आढळून आले. मेकला यांनी हा ‘नजारा’ पाहिला आणि वाहन न थांबविता बडनेऱ्याकडे निघून गेले. काही वेळांनंतर परतीच्या प्रवासातही याच ठिकाणी हे कर्मचारी झाडाखाली आराम करताना आढळून आले. याचवेळी आयुक्त मेकला यांनी पोलीस उपनिरीक्षक मानकर यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. वायरलेसवरील हा संदेश ऐकून पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. कर्तव्यात हयगय करणारे अधिकारी-कर्मचारी खडबडून जागे झाले. पोलीस आयुक्त कोणत्याही क्षणी भेट देऊ शकतात, अशी भीती या घटनेने पोलीस प्रशासनात निर्माण झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक मानकर यांच्या निलंबनाचा लेखी आदेश सोमवारी सकाळी जारी करण्यात आला. या कारवाईला मेकला यांनी दुजोरा दिला. काय सांगितले बचावात?निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या उपनिरीक्षक मानकर यांनी आपल्या बचावात थकवा मिटविण्यासाठी केवळ पाच मिनीट झाडाखाली थांबलो, असे म्हटले आहे. तसेच नाकाबंदीदरम्यान १६ वाहनांची तपासणी आणि चार वाहनांवर कारवाई केली. दुपारी उन्हामुळे वाहतूक रोडावली होती. त्यामुळे थोडी विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली आलो, असे लेखी स्वरुपात आपले म्हणणे मानकर यांनी पोलीस आयुक्तांना सादर केले. तसेच त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांची ये-जा नसल्याने गुन्हेगारीच्या तपासासंदर्भात तपास कसा केला जातो, याची चौकशी करण्यासाठी मानकर यांच्याकडे गेल्याचे आयुक्तांच्या पेशीत सांगण्यात आले.