शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

घरांच्या दुरुस्तीसाठी सव्वाकोटींचे अनुदान

By admin | Updated: September 15, 2015 00:22 IST

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या ३ हजारांवर घरांच्या दुरूस्ती व पूर्ण बांधणीकरिता १ कोटी २४ लाखांचा निधी सर्व तालुक्यांना सोमवारी वितरित करण्यात आला.

तीन हजारांवर घरांचे नुकसान : दर्यापूर तालुक्याला सर्वाधिक १८ लाखअमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या ३ हजारांवर घरांच्या दुरूस्ती व पूर्ण बांधणीकरिता १ कोटी २४ लाखांचा निधी सर्व तालुक्यांना सोमवारी वितरित करण्यात आला. यापूर्वी १६ लाख ६० हजारांची मदत बाधित नागरिकांना वितरित करण्यात आली आहे. यंदा एकूण १ कोटी ४० लाख ६० हजारांचे अनुदान जिल्हा प्रशासनाने दिले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३ हजार १३५ घरांचे नुकसान झाले होते. या घरांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा प्रशासनाने १ कोटी २४ लाखांचे अनुदान सोमवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना वितरीत केले. आतापर्यंत अमरावती तालुक्याला १४ लाख २० हजार, भातकुली १४ लाख २० हजार, तिवसा ११ लाख २० हजार, चांदूररेल्वे ८ लाख २० हजार, धामणगाव रेल्वे ७ लाख २० हजार, नांदगाव खंडेश्वर ६ लाख २० हजार, मोर्शी १२ लाख २० हजार, वरूड १२ लाख २० हजार, अचलपूर १७ लाख २० हजार, चांदूरबाजार ६ लाख २० हजार, दर्यापूर १९ लाख २० हजार, अंजनगाव सुर्जी ४ लाख २० हजार, धारणी ४ लाख २० हजार व चिखलदरा तालुक्यात ४ लाख रूपये असे एकूण १ कोटी ४० लाख ६० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)यापूर्वी १६ लाख ६० हजारांचे अनुदान वितरितजिल्ह्यात यंदा पडझड झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रत्येक तालुक्याला १ लाख २० हजार असे एकूण १६ लाख ६० हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच अमरावती तालुक्यात पूर्णत: घरांसाठी १४ हजार, अचलपूर तालुक्यात १८ घरांसाठी ४४ हजार ७०० अंजनगावला २ घरांसाठी ७ हजार ६०० व चिखलदरा तालुक्यात १ घरासाठी ३ हजार ८०० रुपयांचे अनुदान देण्यात आले.