शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना कर्नल मानांकन प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 19:52 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना एनसीसीतर्फे मानद कर्नल मानांकन ससन्मान प्रदान करण्यात आले.

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना एनसीसीतर्फे मानद कर्नल मानांकन ससन्मान प्रदान करण्यात आले. विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात एन.सी.सी. ग्रुप हेडक्वॉर्टरचे ब्रिगेडिअर संजीव यादव यांनी प्रमाणपत्र व बॅटन देऊन कुलगुरूंना सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख यांची उपस्थिती होती.

मानद कर्नल मानांकन स्वीकारल्यानंतर कुलगुरूंनी सर्वप्रथम भारत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, महाराष्ट्र एन.सी.सी.ने पंधरापेक्षा अधिक वेळा मानाचे पंतप्रधान बॅनर पटकावून विजयाची पताका सातत्याने पुढे नेली आहे. युवकांमध्ये चारित्र्य, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारीचे भान विकसित करून साहस वाढविणे, हा उद्देश एन.सी.सी.चा असला तरी देशाच्या सैनिकी सेवेची बीजे त्याच्या मनात रूजविण्याचे काम सातत्याने केले जात आहे. याशिवाय प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, नियमितता, सहकार्याची भावना, त्याग आदी गुण त्यांच्यात रूजविले जातात, असेही कुलगुरू म्हणाले. सुरूवातीला कुलगुरूंना एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविकेतून कुलसचिव अजय देशमुख यांनी कुलगुरूंच्या सर्वांगीण कार्यावर व उपलब्धीवर प्रकाश टाकला. कर्नल व्ही. रिचर्ड यांनी संजीव यादव यांचा परिचय करून दिला. संचालन नीरज घनवटे यांनी आभार क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक अविनाश असनारे यांनी मानले. कार्यक्रमाला पदमाताई चांदेकर, उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, डी.डब्ल्यू. निचित, अधिष्ठाता स्मिता देशमुख, मनीषा काळे, वित्त व लेखा अधिकारी शशीकांत आस्वले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक मोहन खेरडे, एन.सी.सी. चे कर्नल विक्रम करांडे, कर्नल व्ही. रवी राव, कॅप्टन शीला मॅथ्यूज आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठnewsबातम्या