शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखावर कर्जासाठी तरतूद लागू नाही

By admin | Updated: June 15, 2016 00:29 IST

१० हजार रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज वगळून असे कर्ज महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम १०८५ च्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर देण्यात आलेले असेल तर

अमरावती : १० हजार रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज वगळून असे कर्ज महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अधिनियम १०८५ च्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर देण्यात आलेले असेल तर त्यावरील व्याजापोटी कर्जाच्या मुद्दल रकमेपेक्षा अधिक मोठी रक्कम कोणत्याही रितीने वसूल करता येणार नाही. अशा प्रकारच्या व्याजवसुलीत राज्याच्या सहकार आयुक्तांनी निर्बंध घातले आहेत.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ४४ (अ) प्रमाणे कर्जदार सभासदाने जेवढे कर्ज घेतले आहे तेवढ्या मुद्दलीचे व्याज खातेदाराकडून वसूल करणे अपेक्षित आहे. तथापि सहकारी संस्थांमध्ये, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये कर्जदार सभासदांकडून मुद्दलपेक्षा अधिक व्याज वसूल केले जाते, असे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व सहकारी बँकांना निर्देश देऊन बँकेच्या खातेदारांच्या मुद्दलीपेक्षा अधिक रकमेच्या वसुलीवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांच्या हितार्थ राज्यातील सर्व सहकारी बँकांना कर्जदार सभासदांकडून वसुली करताना या अधिनियमाचे अधिन राहून वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्थांनी वेळोवेळी तपासणी करून सहकारी बँका, सहकारी संस्था या तरतुदीचे पालन करीत नसल्याचे आढळल्यास अशा संस्थांविरूद्ध तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकानी एक लाखांपेक्षा अधिक कर्ज दिले असेल तर या कलमातील तरतुदी लागू होणार नाहीत, तसेच कृषीतर व वाणिज्यिक प्रयोजनासाठी १० हजार रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या कर्जांसाठी ही तरतूद लागू नाही. तसेच १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी दिलेले कर्ज तसेच जलसिंचन किंवा शेतीसाठी दिलेल्या दीर्घ मुदतीच्या कर्जांना ही तरतूद लागू राहणार नाही. (प्रतिनिधी)