शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा १७.५२ कोटींचा निधी उपलब्ध

By admin | Updated: March 22, 2016 00:30 IST

जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले.

मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष पॅकेजअंतर्गत शासनाने १७ कोटी ५२ लाखांचा निधी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला वितरित केला आहे. हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ हेक्टर क्षेत्रामधील शेतीपिके व फळपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये ७० हेक्टरमधील भात, ५ हजार ८०६ हेक्टरमधील कपाशी, १० हजार ४१ हेक्टरमधील सोयाबीन, १६ हजार ५४२ हेक्टरमधील तूर, ३ हजार १४५ हेक्टरमधील मूग व उडीद, ६५.४९ हेक्टरमधील ज्वारी व १८६ हेक्टर मधील इतर पिके बाधित झाली, असे एकूण ३५ हजार ८२८ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. तसेच फळपिकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी, असे १ हजार ११७ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाद्वारा प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या एप्रिल ते जून मधील नुकसानीसाठी मदतयंदा एप्रिल ते जून महिन्यात वादळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील थोड्या प्रमाणात शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले होते. यामध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाने शुक्रवारी ३ लाख ३८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध केला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मिळणार दिलासासन २०१४-१५ मधील अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाही शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस व गारपिटीने घाला घातला आहे. त्यामुळे पार मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हा निधी आधार देणारा ठरेल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होईल.