शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तूर, हरभऱ्यासाठी तात्पुरते गोदाम उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:09 IST

गोदाम नसल्याच्या सबबीखाली शासनाने शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी बंद केली. मात्र, सर्वच बाजार समित्यांमध्ये जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोदामाची उभारणी करून शेतमालाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी केली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोदाम नसल्याच्या सबबीखाली शासनाने शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी बंद केली. मात्र, सर्वच बाजार समित्यांमध्ये जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोदामाची उभारणी करून शेतमालाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी केली.शासनाने तूर खरेदी बंद केल्यामुळे जिल्ह्यातील ६५ हजारांवर शेतकºयांचे पाच लाख क्विंटलवर तूर व हरभरा घरी पडून आहे. प्रशासनाद्वारा गोदाम उपलब्ध नाही आदी सबबी सांगण्यात येत आहेत. सर्वच बाजार समित्यांमध्ये भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोदामांची उभारणी करून समस्या सोडविली जाऊ शकते. अनेक साखर कारखान्यांमध्ये अशाच प्रकारे गोदामाची उभारणी करून साखरेची साठवणूक केली जाते याकडे आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ही व्यवस्था अत्यंत कमी वेळात उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांच्या घरी व बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये असलेल्या तूर व हरभऱ्याच्या खरेदी समस्या निकाली काढली जाऊ शकते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक अडचण भागविली जाऊ शकते. त्यामुळे सर्वच बाजार समित्यांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागीच तात्पुरत्या स्वरूपात गोदामाची उभारणी करावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली.जलपूजनाला डावलल्या जातेय, आरोपतिवसा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कृषी, पाटबंधारे व जलसंपदा विभागाच्या अनेक कामे सुरू आहेत. स्थानिक आमदार तालुका समितीचे अध्यक्ष असताना डावलले जात असल्याचा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी सादर निवेदनात केला. तसेच कामे सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनादेखील कामांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे भूमिपूजन, जलपूजनाच्या वेळी आमदारांना पूर्वसूचना देऊन अवगत करावे, यासाठीचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.