शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पंढरपूर पायी दिंडी मार्गावर सुविधा द्या!

By admin | Updated: November 10, 2016 00:14 IST

आषाढी एकादश्ीचया पर्वावर विदर्भ व मराठवाड्यातील वेगवेगळ्या मार्गाने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी...

यशोमती ठाकूर यांची मागणी : ग्रामविकास मंत्र्यांना निवेदनअमरावती : आषाढी एकादश्ीचया पर्वावर विदर्भ व मराठवाड्यातील वेगवेगळ्या मार्गाने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी मार्गावर सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासनााकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा व यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादश्ीाच्या पर्वावर संपूर्ण राज्यातून वेगवेगळ्या मार्गाने पायी दिंडी जातात. या दिंडी मार्गावर तात्पुरत्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येतो. मात्र, राज्यातील पुणे, सातारा व सोलापूर या तीनच जिल्ह्यांना आजवर हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. विशेष म्हणजे विदर्भ व मराठावाडा भागातील श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा मुद्दा आ. यशोमती ठाकूर यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या दालनात उपस्थित करून तिवसा विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुख्मिणी मातेच्या पालखीचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे ही दिंडी सन १५९४ पासून महाराष्ट्रातून सर्व प्रथम जाणारी असून प्रथम पालखीचा मानही या दिंडीला असल्याची बाबही त्यांनी ना. मुंडेच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी चर्चा करताना शासनाकडून राज्यातील केवळ तीनच जिल्ह्यांना हा निधी आजवर देण्यात आला. मात्र, विदर्भ व मराठवाड्यातील दिंडी मार्गावर सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळत नाही, याचा अर्थ काय? असा रोखठोक सवालही आ. यशोमती ठाकुरांनी उपस्थित केला. त्यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हा महत्वाचा विषय असून याबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर आढावा बैठक आयोजित करून यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्याच्या दृष्टिने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. आता आषाढी वारीच्या पायी दिंडी मार्गावर वारकऱ्यांचा पंढरपूर प्रवास सुखदायक होणार आहे. (प्रतिनिधी)