स्वातंत्र्य लढ्यातही योगदान : निंबोली अन् धामणगावचा मोठा वाटामोहन राऊत धामणगांव रेल्वेदेशाच्या स्वातंत्र्यात अनेक देशभक्तानी प्राणांची बाजी लावली़विद्यानगरी असलेल्या या शहरात पारतंत्र्य काळात स्वातंत्र्यासाठी अनेकांनी मशाल पेटवीली आजही या भारत मातेचे रक्षण १०८ सुपुत्र करीत आहे़धामणगाव शहरातील सुगनचंद लुनावत, अंबादासजी भेंडे, बाबासाहेब अंदुरकर, गुलाबरावजी झाडे यांच्यासह अनेक माजी सैनीक होवून गेले आहेत़ त्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासोबत स्वातंत्र्याकरीता लढा दिला होता़ तालुक्याचे आजही या राष्ट्रीय कामात मोठे योगदान आहे़ आज पर्यंत झालेल्या युध्दात तसेच सिमेपलीकडील हल्यात दोन जवान शहीद झाले आहे़ जन्म देणाऱ्या आई पेक्षा भारत मातेलाअधीक सन्मान देणारे धामणगाव तालुक्यात १०५ सैनीक आहेत़ उत्तरपूर्व, सागरी सिमा असलेल्या त्रिकोणी भागात भारतीय सरंक्षण खात्यातील तीन्ही विभागात धामणगावातील सैनीक कार्यरत आहे़सावळा व निंबोली हे गाव आजही सैनीकाचे गाव म्हणून ओळखले जाते़ सावळ्यातील चिकटे कुटूंबातील दोन सदस्य सैनीकाचे कार्य पार पडत आहे़ तर निंबोली येथील विशाल प्रशांत वैरागडे यांच्यासह याच गावातील सहा सैनीक देशसेवेचे कर्तव्य बजावत आहे़स्वातंत्र्य लढ्यात कावलीचेही योगदान तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे असलेल्या गावाचा स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. सन १९४२ मध्ये येथील गुलाबराव झाडे, देवराव इंगळे यांनीमोठा मोर्चा काढला होता ़ घरावर तुळशीपत्र ठेवून या दोघांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता़जिल्ह्यात १४ वीरपूत्र झाले शहीद आजपर्यंत सिमेपलीकडील हल्ला, भारत-पाकिस्तान दरम्यान मधील झालेले युध्द, कारगील युध्द यात जिल्ह्यातील १४ तर धामणगाव तालुक्यातील आजनगाव व पिंपळखुटा येथील दोन जवान शहीद झाले आहे़ आजही त्यांच्या वीरपत्नी, वीरमातांना सन्मान दिला जातो.
धामणगावातील १०८ सुपुत्र करतात भारत मातेचे रक्षण
By admin | Updated: August 15, 2016 00:03 IST