शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाने मागविले तीन प्रकल्पांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:03 IST

पंढरी, वासनी व बोर्डी नाला हे मध्यम प्रकल्प अंदाजे १७०० कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देकामे खोळंबली : पर्यावरणाच्या मान्यतेअभावी रखडले प्रकल्प

संदीप मानकर ।लोकमत आॅनलाईनअमरावती : पंढरी, वासनी व बोर्डी नाला हे मध्यम प्रकल्प अंदाजे १७०० कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात करण्यात येत आहेत. सदर प्रकल्प पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी रखडले असून, यासंदर्भात राज्य शासनाकडून केंद्राने त्वरित प्रस्ताव मागविला आहे. पुढील महिन्यात हा मुद्या निकाली निघेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.तीनही प्रकल्पांचे कामे शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर १६ हजार ८१३ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला संरक्षित सिंचन मिळणार असून, या भागातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. पंढरी, बोर्डी नाला, वासनी या तीनही मध्यम प्रकल्पासाठी २००६ च्या कायद्यानुसार सदर मध्यम प्रकल्पांना पर्यावरण विभागाची मान्यता घेणे बंधनकारक असताना जलसंपदा विभागाने ती मान्यता घेतली नाही. त्याकारणाने कायदेभंग झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. १४ मार्च २०१७ रोजी शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार त्या प्रकल्पांना केंद्र शासन मान्यता देईल, असे जाहीर करण्यात आलेले होते. या अधिसूचनेच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयाने स्टे दिला होता यानंतर हा स्टे उठविण्यात आला. हे तीन प्रकल्प राज्य शासनाचे असल्यामुळे व पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे प्रकल्प असल्याने याची पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचत नाही. उलट यामुळे प्रर्यावरणाला फायदाच होतो यामुळे या प्रकल्पांना मान्यता मिळणे गरजेचे आहे. या तीनही प्रकल्पांचे ६० ते ७० टक्के ही कामे पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सिंचन निर्मिती होणार आहे.या प्रकल्पाला द्यावी मान्यताजिल्ह्यासाठी सदर तीनही मध्यम प्रकल्प हे महत्त्वाचे असल्याने केंद्राने या प्रकल्पाला त्वरित मान्याता द्यावी, अशी मागणी होत आहे. कारण जर काही महिने मान्यात मिळाली नाही, तर प्रकल्पाची किमतीसुद्धा वाढतात. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेले आहे, त्यांना व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, हे विशेष!अशी होणार सिंचन निर्मितीपंढरी प्रकल्पातून ८ हजार ३७० हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे, तर वासनी प्रकल्पातून ४ हजार ३१७ हेक्टर व बोर्डी नाला प्रकल्पातून ४ हजार १२६ हेक्टर सिंचन होणार आहे. असे एकूण १६ हजार ८१३ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.राज्य शासनाकडून केंद्राने सदर प्रस्ताव मागविला आहे. पर्यावरण विभागाची मान्यता त्वरित मिळाल्यास यामुळे हजारो हेक्टर सिंचननिर्मिती होऊन या भागातील शेतकºयांना त्याचा फायदा होणार आहे.- रमेश ढवळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग